MLA Tanaji Sawant | शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Tanaji Sawant | बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जाऊन मिळाल्याने शिवसैनिकांनी आमदार तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांच्या बालाजीनगर (Balaji Nagar, Pune) येथील कार्यालयाची तोडफोड (Office Vandalism) केली. (Pune Crime)

 

आमदार तानाजी सावंत यांचा सोलापूर (Solapur) जिल्ह्यात भैरवनाथ शुगर वर्क्स लि. साखर कारखाना आहे. त्याचे कार्यालय बालाजीनगर येथे आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदार तानाजी सावंत हे सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. या भागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे (Vishal Dhanawade) तसेच कुणाल धनवडे (Kunal Dhanawade) व इतर शिवसैनिक कार्यकर्त्यांनी आज सकाळी भैरवनाथ शुगर वर्क्सच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. कार्यालयात शिरुन आतील काचा फोडल्या तेथे गद्दार असे लिहून जोरदार घोषणाबाजी केली.

 

 

Web Title :- MLA Tanaji Sawant | Shiv Sena rebel MLA Tanaji Sawants office vandalized in Pune

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा