MLA Uday Samant | ‘योगेश कदमांना संपवायच्या षडयंत्राच्या बैठकीत मीही होतो’, उदय सामंत यांची जाहीर सभेत कबुली

0
293
MLA Uday Samant | uday samant live speech in khed statement on yogesh kadam political end
file photo

खेड/रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील गोळीबार मैदानावर ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा काही दिवसांपूर्वी झाली होती. त्यानंतर याच मैदानावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची जाहीर सभा होत आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (MLA Uday Samant) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून कशा प्रकारे प्रयत्न केले, यावर उदय सामंत (MLA Uday Samant) यांनी भाष्य केलं.

 

उदय सामंत (MLA Uday Samant) म्हणाले, योगेश कदम यांना राजकारणातून कसं सपवायचं? हे षडयंत्र ज्या बैठकीत रचलं त्या बैठकीत मी देखील उपस्थित होतो. दापोलीच्या निवडणुकीत योगेश कदमांना किती तिकिटं द्यायची, यावर फार मोठी चर्चा झाली. त्यांच्यापेक्षा राष्ट्रवादीला जास्त तिकिटं द्यायची, असा अघोषित नियम झाला होता. यानंतर योगेश कदम यांना काहीच द्यायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी (NCP) रुजवायची हा निर्णय शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी घेतल्याचे सामंत यांनी सांगितले.

 

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना सामंत म्हणाले, पाच तारखेची सभा ही कॉर्नर सभा होती.
ती विचार देणारी सभा नसून शिवीगाळ करणारी सभा होती. गेल्या 50 वर्षात अनेक मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावं लागलं.
आठ महिन्यांपूर्वी शिंदे यांनी आम्हाला गुवाहाटीला नेऊन आणलं.
ते काही लोकांना इतकं वर्मी लागलंय, की अजून ते बाहेरच आले नाहीत, असा टोला उदय सामंत यांना लगावला.

 

Web Title :- MLA Uday Samant | uday samant live speech in khed statement on yogesh kadam political end

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chhagan Bhujbal | ‘फडणवीसांना ‘या’ पदावर बघायला आवडेल’, छगन भुजबळांनी सांगितली ‘मन की बात’

Aaditya Thackeray | दीपक केसरकारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ते तर माझ्या आजोबांकडे…’

Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून आरोपीचा पलायन करण्याचा प्रयत्न, पण…