MLA Varsha Gaikwad | काँग्रेसमध्ये भाकरी फिरली, भाई जगताप यांची मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरुन उचलबांगडी; वर्षा गायकवाड नवीन अध्यक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसने मुंबईतील (Mumbai Congress) पक्षसंघटनेत मोठा फेरबदल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांची मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरुन (Mumbai Pradesh Congress President) उचलबांगडी केली आहे. तर त्यांच्या जागी माजी शालेय शिक्षण मंत्री आणि आमदार वर्षा गायकवाड (MLA Varsha Gaikwad) यांची मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी वर्षा गायकवाड (MLA Varsha Gaikwad) यांच्या नावाची घोषणा केली.

 

https://twitter.com/ANI/status/1667173550317346816?s=20

 

के.सी. वेणुगोपाल (Congress General Secretary K.C. Venugopal) यांनी मुंबई बरोबरच गुजरात आणि पाँडेचेरीमध्येही नव्या प्रदेशाक्षांची नियुक्ती केली आहे. वर्षा गायकवाड (MLA Varsha Gaikwad) ह्या काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांच्या कन्या आहेत. त्या मुंबईतील धारावी मतदारसंघातून (Dharavi Constituency) सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. तसेच 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) शालेय शिक्षण मंत्री (Minister of School Education) म्हणून काम पाहिले आहे. त्याआधी आघाडी सरकारच्या काळात महिला आणि बालविकास मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.

 

मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर वर्षा गायकवाड यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
आगामी मुंबई महापालिका (BMC Election), लोकसभा (Lok Sabha), विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections)
काँग्रेसच्या पक्ष संघटनेची बांधणी करण्याचं काम त्यांना करावं लागणार आहे. तसेच महाविकास आघाडीत सुसंवाद राखून मुंबईत मविआ टिकवण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

 

Advt.

Web Title : MLA Varsha Gaikwad | varsha gaikwad appointed as mumbai pradesh congress president bhai jagtap uplifted

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा