UP मध्ये आणखी एका आमदारावर बलात्काराचा आरोप, व्हिडीओ कॉलवर न्यूड होण्यासाठी लावायचा तगादा

लखनौ : पोलीसनामा ऑनलाइन –  हाथरस प्रकरण ताजे असतानाच आता उत्तर प्रदेशातील एका आमदारावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेने ज्ञानपूर येथील आमदार विजय मिश्रा याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली आहे. २०१४ सालापासून आमदार धमकावत असून अनेक वेळा त्याने आपले शारीरिक शोषण केले, असा आरोप या महिलेने केला आहे.

याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन आमदार विजय मिश्रा यांच्याविरोधात भदोहीमधील गोपीगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. त्यासोबतच अन्य दोघांविरुद्ध महिलेने तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी विजय मिश्रा, विष्णू मिश्रा आणि विकास मिश्रविरोधात तक्रार दाखल केली आहे.

MLA Vijay Mishra from Uttar Pradesh has been accused of rape and tried to be nude on a video call | उत्तर प्रदेशमधील अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप, व्हिडीओ कॉलवर न्यूड होण्यासाठी लावायचा तगादा

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये झालेल्या एका कार्यक्रमावेळी गायिका असलेल्या पीडित महिलेचे विजय मिश्रा याने पहिल्यांदा शोषण केले होते. त्यानंतर तो तिचे सातत्याने शोषण करत आला आहे, तो तिला व्हिडीओ कॉलवर न्यूड होण्यासाठी तगादा लावत होता. तद्वतच असे न केल्यास जीवे मारण्याची धमकीही देत असे. व्हिडीओ कॉलवर विजय मिश्रा स्वतः सुद्धा न्यूड होत असे व आपल्यालाही न्यूड होण्याकरता जबरदस्ती करत असे, असा आरोप पीडितेने केला.

तथापि, या आमदाराने आपल्या बरोबर अन्य महिलांनाही आपल्या वासनेचा शिकारी बनवले आहे. पण या आमदाराच्या दबदब्यामुळे तक्रार देण्यासाठी कुणी पुढे येत नाही. मी देखील घाबरून इतके दिवस गप्प होते. मात्र, आमदार तुरुंगात गेल्याने मी हिमतीने त्याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. या व्यक्तीविरोधात सर्व तरुणींनी एकत्र येत आवाज उठवला पाहिजे, असे या पीडित महिलेने म्हटले आहे.