बहुजन विकास आघाडीला ‘सुरुंग’ ! बोईसरचे आमदार विलास तरे शिवसेनेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर आणि बोईसर विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार बदलाचे संकेत मिळत असून पालघरमध्ये अमित घोडा यांच्या जागी श्रीनिवास वनगा तर बोईसरमध्ये बहुजन विकास आघाडीचे विलास तरे हे शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांना बोईसरमधून शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांना बोईसरमधून उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला.

श्रीनिवास वानगांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे जाहीर वक्तव्य केल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा पेच उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. जनमानसात आपल्यावरचा विश्वास ढळू न देता श्रीनिवास यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यामुळे पालघर विधानसभेचे तिकीट श्रीनीवास यांना देण्याबात चर्चा सुरु असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार म्हणून आमदार विलास तरे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे आपल्या कर्तृत्वावर जनमतावर विशेष प्रभाव निर्माण केलेला नसल्याने त्यांना यावेळी उमेदवारी नाकारण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यामुळे विलास तरे हे मागील अनेक महिन्यांपासून शिवसेनेच्या संपर्कात होते. अखेर त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश करून बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –