आमदार विनायक मेटेंचा आवाज काढून पोलीस निरीक्षकाला फसवणारा गजाआड

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

आमदार विनायक मेटेंचा आवाज काढून पोलीस निरीक्षकाला फसवणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. आमदार मेटे यांचा आवाज काढून पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्याकडून सहा लाख २० हजार रुपये घेऊन फसवले होते. पोलिसांनी नवनाथ इसरवाडे याला अटक केली असून तो शिवसंग्राम संघटनेचा तालुकाध्यक्ष आहे.
[amazon_link asins=’B00GASLORE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’78957aaa-a7a3-11e8-9d4d-ad4837d6c922′]

शिवसंग्राम संघटनेचा शेवगाव (जि. नगर) तालुकाध्यक्ष नवनाथ हरिश्चंद्र इसरवाडे (रा. गदेवाडी, शेवगाव) याच्यासह आणखी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नवनाथ इसरवाडे हा मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम या संघटनेचा शेवगाव तालुकाध्यक्ष आहे. त्याने पोलीस निरीक्षक ओमासे यांच्याशी संपर्क करून आपण शिवसंग्राम संघटनेचा तालुकाध्यक्ष असल्याचे सांगत ओळख वाढवली, विश्वास संपादन केला. नंतर त्यानेच ओमासे यांना मेटे यांचा ९४२३२४९१९१ असा मोबाइल क्रमांक असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तो त्याचा स्वत:चाच होता. त्याच क्रमांकाच्या मोबाइलवरून इसरवाडे याने मेटे यांचा आवाज काढून व मी आमदार मेटे बोलत आहे, असे सांगून वेगवेगळ्या कारणांसाठी ओमासे यांच्याकडे पैशाची मागणी केली. अनेकदा पोलीस ठाण्यातच ही मागणी केली. ओमासे यांना आपली स्वत:ची फसवणूक झाल्याचे लक्षात आले, त्यानंतर त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
[amazon_link asins=’B00TKFEE5S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d6244ce-a7a3-11e8-ab81-f9e043a3f628′]

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात हरिश्चंद्र इसरवाडे याला गुरुवारी (दि.२३) रात्री स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना इसरवाडे यांच्याबद्दलीच माहिती मिळाली होती. त्यावरून दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे, नाणेकर, रवींद्र कर्डिले आदींच्या पथकाने त्याला अटक केले आहे.