औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला आमदार व मंत्र्यांकडून केराची टोपली, घेतला कार्यकर्ता मेळावा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येने एक हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन लावला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय कार्यक्रम, सभा, मंगल कार्यालयात लग्न करण्यास मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा : Gold Rate Today : लग्नसराईच्या काळात पुन्हा सोन्याचे दर वधारले, जाणून घ्या 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आणि लॉकडाऊन असताना जिल्ह्यातील राजकीय नेते नियमांना धाब्यावर बसवत आहेत. राजकीय नेत्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मेळावा घेतला. या मेळाव्याला मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे, शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, रमेश बोरणारे यांनी मेळाव्याला उपस्थिती लावली होती. यातील एकानेही तोंडाला मास्क लावलेला नव्हता, ना उपस्थित लोकांनी मास्क लावले होते.
एकनाथ खडसेंनी सांगितलं जळगाव महापालिकेतील विजयाचे ‘गुपित’, म्हणाले…

एकीकडे सामान्य नागरिकांनी तोंडाला मास्क लावला नसेल तर पाचशे रुपयांचा दंड आकारला जातो. तर दुसरीकडे राजकीय नेतेमंडळी कार्यक्रम घेतात आणि कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करतात. मात्र, त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सत्ताधारी नेत्यांवर जिल्हा प्रशासन कारवाई करणार का हे पहावे लागणार आहे.
तुमच्यासाठी महत्वाचे : SBI ची खास सुविधा ! आता कागदपत्रांशिवाय घरबसल्या काही मिनिटांत उघडा खाते, जाणून घ्या प्रक्रिया

जिल्हा प्रशासन आणि पोलीस खाते सामान्य नागरिकांना मास्क लावला नाही, म्हणून दररोज लाखो रुपयांचा दंड वसूल करीत आहेत. नागरिक देखील आपली चूक मान्य करत दंडाची रक्कम भरत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन दंड भरणार का ? लोकप्रतिनिधी जर कोरोना नियम पाळत नसतील तर त्यांनी लोकांना नियम पाळा असे कसे सांगू शकतात ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 1335 रुग्ण आढळून आले आहेत.तर गेल्या 24 तासात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 422 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 52 हजार 515 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 1368 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 7552 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Read More..

Coronavirus in Pune : ‘कोरोना’मुळं पुण्यात आतापर्यंत 5000 जणांचा मृत्यू ! गेल्या 24 तासात 2750 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 22 जणांचा मृत्यू

कोरोनाचा धोका वाढला ! CM ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, मोठा निर्णय घेणार ?

राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार का ? आरोग्य मंत्री टोपे म्हणाले…

Sachin Vaze Case : प्रकरणाचं नागपूर कनेक्शन? खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत केला ‘हा’ दावा

TMC म्हणजे ‘ट्रान्सफर माय कमिशन’ – PM मोदी

फडणवीसांनी घेतली PM मोदी, HM शाह यांची भेट, राज्यातील वाझे प्रकरणावर केली चर्चा?