MLAs Disqualification Case | आमदार अपात्र कारवाईला वेग, विधानसभा अध्यक्ष शिंदे-ठाकरे गटाच्या प्रमुखांना नोटीस पाठवणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) आमदार अपात्र प्रकरणात (MLAs Disqualification Case) एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ताशेरे ओढल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी आमदार अपात्र प्रकरणाला गती दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्ष शिंदे गटाचे (Shinde Group) प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नोटीस पाठवणार असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. (MLAs Disqualification Case)

शिंदे आणि ठाकरे यांना आमदार अपात्रेबाबत आपली बाजू मांडावी लागणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभा अध्यक्ष नोटीस पाठवणार आहेत. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीसाठी दोन्ही गटांच्या पक्षप्रमुखांनी आपली बाजू एक ते दोन आठवड्यांत मांडण्याबाबत या नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात सत्तासंघर्षाच्या सुनावणी बाबत निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रेच्या प्रकरणावर (MLAs Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील असे निर्देश दिले होते. बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवसभरात कायदेतज्ज्ञ आणि विधीमंडळाच्या सचिवालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर दोन्ही गटाच्या प्रमुखांना नोटीस पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरुन आमदार अपात्रतेच्या प्रकरणाला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

न्यायालयाने काय म्हटलं?

दरम्यान, आमदार अपात्र याचिकेवर विलंब होत असल्याची याचिका ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात केली होती.
यावर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले, आमदारांच्या अपात्रतेसंबंधित आम्ही निर्देश देताना तीन महिन्याची
मर्यादा ठेवली नव्हती, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आदर केला पाहिजे, असे सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं होतं. आम्ही तीन महिन्यांची डेडलाईन जरी दिली नाही,
तरी विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाचा अवमान करावा, असा त्याचा अर्थ नाही.
याप्रकरणातील सुनावणीमध्ये वेळकाढूपणा का करताय? असा सवाल करत न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना
खडेबोल सुनावले होते. तसेच या याचिकेवर 3 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी होणार असल्याची माहिती सुप्रीम कोर्टाने दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Health Tips | इम्युनिटी वाढवण्यासाठी नियमित काढा पिता का? शरीराच्या या अवयवांचे होते नुकसान