MLAs Disqualification Case | आमदार अपात्र प्रकरण! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, शिंदे गटाचे आमदार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार आपत्रतेच्या प्रकरणावर (MLAs Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने (Thackeray Group) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर (Vidhansabha Speaker Rahul Narvekar) यांना खडेबोल सुनावले होते. शिवसेनेच्या (Shivsena) 16 आमदारांच्या अपात्रतेवर (MLAs Disqualification Case) एका आठवड्याच्या आत सुनावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. यानंतर आमदार अपात्रतेच्या प्रकरणाला गती आल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे ते आता काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राहुल नार्वेकर हे नेमक्या कोणत्या कारणासाठी दिल्लीला गेले आहेत, याबाबत शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, आमचे दिल्लीतील वकील, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आमची बाजू मांडली. त्यांच्याशी चर्चा करणं महत्त्वाचं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा नेमका आदेश काय आहे? हेही समजून घ्यायला पाहिजे. यासाठी नार्वेकर दिल्लीला रवाना झाले आहेत. यामध्ये काही विशेष नाही. (MLAs Disqualification Case)

सर्वोच्च न्यायालयाने काही कालमर्यादी दिली नाही. परंतु न्यायालयाने सांगितले आहे की, ही कारवाई थोडी जलद गतीने करा. यासाठी प्रक्रिया डावलून कारवाई करा, असं म्हटलं नाही. त्यामुळे प्रक्रियेप्रमाणे ही कारवाई करायची आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांसाठी जेवढा वेळ लागणार आहे, त्याबाबत दिल्लीत चर्चा होईल, अशी माहिती शिरसाट यांनी दिली.

संजय शिरसाट पुढे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय आहेत? सुप्रीम कोर्टाचे अधिकार काय आहेत? या दोन्ही न्यायीक संस्था आहेत. यामध्ये कुठे ना कुठे एकमेकांच्या अधिकारांवर गदा येते का? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे कदाचित याबाबत चर्चा करण्यासाठी राहुल नार्वेकर दिल्लीला गेले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | विसर्जन हौदाची पाहणी करताना आरोग्य कर्मचाऱ्याला वीजेचा धक्का, दोन्ही पाय जळाले; हॅपी कॉलनीतील घटना