आमदारांची बैठक संपली, मुख्यमंत्री पदावर शिवसेना ‘ठाम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज बोलावलेली आमदारांची बैठक संपली असून बैठकीत शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची मागणी कायम असल्याचं बैठकीनंतर आमदार शंभूराजे देसाई यांनी सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे ठरलं ते व्हाय, उध्दव ठाकरेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम असेल हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सर्व आमदारांनी उध्दव ठाकरे जे निर्णय घेतील तो अंतिम असेल असं सांगितल्याचं देखील देसाई म्हणाले. दरम्यान, बैठक चालु असताना सर्व आमदारांचे मोबाईल फोन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळं शिवसेना अद्यापही मुख्यमंत्री पदावरून अडली असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, भाजपाचे नेते आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ते तिघेही राजभवन येथे राज्यपालांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत.

Visit : Policenama.com