MLC Election 2023 | काँग्रेसबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर नाना पटोले यांनी संजय राऊत यांना सुनावले

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – विधानपरिषदेच्या (MLC Election 2023) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीमध्ये चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीस आयात उमेदवार द्यावा लागला. त्यावर महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या शिवसेना ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली होती. (MLC Election 2023) त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना सुनावले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा घोळ झाला, आणि तो अजूनही सुरूच असून, त्यात आम्हाला पडायचे नाही.’ असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना सुनावले आहे. (MLC Election 2023)

नाना पटोले या संजय राऊतांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले, ‘संजय राऊत काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. मी आज दि.१७ अमरावतीत आहे. उद्या मुंबई येथे पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची माहिती माध्यमांना देऊ.’ असे यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले. (MLC Election 2023)

दरम्यान, काल दि.१६ माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, ‘काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा घोळ झाला. अद्यापही तो सुरु असून, त्यात आम्हाला पडायचं नाही. शिवसेनेने शुभांगी पाटलांना पाठिंबा दिला आहे. याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सूचना दिल्या आहेत. महाविकास आघाडीचा निर्णय घ्यायचं, तर सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे. त्यामुळे नागपूरची उमेदवारी आम्ही मागे घेतली आहे.’

तसेच यावर पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, ‘महाविकास आघाडीच्या निर्णयाबाबत विस्कळीतपणा
दिसला. पुन्हा गोंधळ होऊ नये, हा धडा महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाने घेतला पाहिजे.
प्रत्येक वेळी त्याग करण्याची जबाबदारी शिवसेनेवर असते. हा त्याग आम्ही करत आलो आहोत.
पण, यापुढे असं होणार नाही.’ असे यावेळी बोलताना संजय राऊत यांनी खडसावून सांगितले होते.

Web Title :- MLC Election 2023 | nana patole reply sanjay raut on nashik nagpur amravati vidhan parishad election