अनेक लॅबमध्ये होतो पैथोलॉजिस्टच्या सहीचा गैरवापर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – विविध लॅबमध्ये सहीचा गैरवापर करणाऱ्या नाशिकमधील एका पैथोलॉजिस्टवर महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलने कारवाई केली असून त्यास ६ महिन्यांसाठी निलंबित केले आहे. लॅबमध्ये स्वत: उपस्थित नसताना आपली सही वापरण्याची मुभा दिल्याचा आरोप या पैथोलॉजिस्टवर आहे. राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार सर्रास घडत असल्याचे सुत्रांनी सांगितले. असे प्रकार रूग्णांच्या दृष्टीने अतिशय घातक ठरू शकतात.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक प्रॅक्टिसिंग पैथोलॉजिस्ट वेलफेअर असोसिएशनने २०१६ साली संबंधित पैथोलॉजिस्टविरोधात महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलकडे तक्रार केली होती. याबाबत चौकशी केल्यानंतर मिळालेल्या पुराव्यानुसार महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलनं संबंधित पैथोलॉजिस्टवर कारवाई केली. महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलने याबाबत दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, संबंधित डॉक्टर अनेक पॅथ लॅबशी संलग्न होते. पैथोलॉजि रिपोर्ट न पाहता त्यावर सही केली जात होती.

या टेस्टवर देखरेखही ठेवली जात नव्हती. या पैथोलॉजिस्टसचे नाव विविध पॅथ लॅब वापरत होत्या. या डॉक्टरच्या देखरेखीखाली कोणतीही तपासणी झाली नसतानाही रुग्णांना रिपोर्ट दिले जात होते. यामुळे ही कारवाई करण्यात आली असून अशाप्रकारामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येतो. काऊन्सिलने या डॉक्टरला त्याचे नोंदणी प्रमाणपत्र आणि अतिरिक्त पदवी प्रमाणपत्र शिक्षा पूर्ण होईपर्यंत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

पैथोलॉजि लॅबमध्ये उपस्थित राहणे पैथोलॉजिस्टला बंधनकारक आहे. पैथोलॉजिस्टचे काम फक्त सह्या करण्याचे नसून चाचण्यांवर लक्ष ठेवणे आणि त्यावेळी काही चुका झाल्यास त्या दुरूस्त करणे हे आहे. अनेक पैथोलॉजिस्ट लॅबमध्ये असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे सरकार जोपर्यंत कारवाई करत नाही, तोपर्यंत रुग्णांनी स्वत:च काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच डॉक्टरांनीही रुग्णांना पैथोलॉजिस्ट लॅबमध्ये पाठवताना तिथं पैथोलॉजिस्ट असेल, याची खात्री करून घ्यायला हवी. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पैथोलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टनं २०१२ पासून अशा पैथोलॉजिस्टविरोधात तक्रार नोंदवली आहे.

Loading...
You might also like