MMRDC | ठाणेकरांसाठी खुशखबर ! ठाणे ते बोरिवलीचा प्रवास लवकरच होणार अवघ्या 15 मिनिटात

ठाणे : MMRDC News | महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MMRDC) शहरे विकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्या देखरेखीत ठाणे आणि बोरिवलीला जोडणारा एक भूमिगत रस्ता (Thane to Borivali under ground way) बनवण्याची योजना आखली आहे.

या योजनेचा अंदाजित खर्च 11235.43 कोटी रूपये आहे. ठाणे-बोरिवलीला जोडणार्‍या या दुहेरी भुयारी मार्गावरून वेगवान प्रवास होईल, सोबतच घोडबंदर रोडवरील सध्याची वाहतूक कमी होईल.

मार्गात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली 10.25 किलोमीटर लांबीचे दोन-तीन भुयारी मार्गांसह 11.5 किलोमीटर लांब कनेक्टिंग रोड असेल, जो ठाण्यात टिकुजी वाडी ते बोरिवलीमध्ये पश्चिम एक्सप्रेसवे पर्यंत जाईल.

हा भुयारी मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणार असल्याने एमएसआरडीसीने येथील जीवसृष्टी
आणि हरितसृष्टीला त्रास होऊ नये म्हणून भुयार खोदण्याच्या मशीनने भुयार खोदताना विशेष
काळजी घेतली आहे.

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आत 16.54 हेक्टर खासगी जमीन
आणि 40.46 हेक्टर जमीनीचे अधिग्रहण करण्याची आवश्यकता आहे. मार्च 2022 मध्ये सुरू
होणारी ही योजना पूर्ण होण्यास साडेपाच वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा

PM Kisan | कोट्यावधी शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार रुपये, नववा हप्ता ‘या’ महिन्यात मिळणार

Job Alert | राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर इथे होणार मोठी भरती ! परीक्षा नाही थेट मुलाखत, जाणून घ्या मुलाखतीची तारीख

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  MMRDC | trip from thane to borivali will just be 15 minutes away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update