घर खरेदी करण्यापेक्षा ‘रेन्ट’ने रहा ; EMI च्या पैशातून मिळतो १.३८ कोटींचा ‘फंड’, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही वर्षांपासून रिअल इस्टेटमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक तोट्यात जात आहे आणि खूप कमी परतावा मिळत आहे. लाखो रुपये खर्च करून घर घेणे आणि प्रत्येक महिन्यात हजारो रुपयांचा EMI भरणे खरंच फायदेशीर ठरत आहे का ? की मंदीच्या या काळात भाड्यानेच घर घेणे फायदेशीर ठरत आहे. आम्ही तुम्हाला गुंतवणुकीच्या याच धोरणांबद्दल सांगणार आहोत. यामध्ये तुम्ही भाड्याच्या घरात राहून संभावित EMI ची बचत करून २० वर्षांमध्ये १.३८ कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता. चला जाणून घेऊ या.

सरासरी २५ ते ३० लाख रुपयात मिळतो २ BHK का फ्लॅट
गेल्या एका वर्षात मुंबई आणि चेन्नईतील रिअल इस्टेटमधील किंमती ३ टक्यांनी कमी झाल्या आहेत. इतर शहरात देखील अशीच परिस्थिती आहे. या शिवाय एका सामान्य परिसरात २५ ते ३० लाख रुपयांचा २ BHK फ्लॅट आरामात मिळतॊ.

समजा घर घेण्यासाठी तुम्ही १० % सुरवातीचा टप्पा भरत असाल तर तुम्हाला २२.५० लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया सामान्य पगारदारांना ८.६५ % व्याज दराने होम लोन देते. जर तुम्ही २० वर्षांसाठी SBI कडून होम लोन घेत असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्यात जवळपास २० हजार रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा परिस्थिती तुम्हाला रेडीमेड घर मिळत असेल तर तुम्हाला २० हजार रुपये भरावे लागतील.

फॉलो करा हे गुंतवणूक धोरण, मिळेल १.३८ कोटींचा फंड

१ भाड्याने घ्या २ BHK फ्लॅट
गाजियाबाद नोएडा या भागातील अनेक प्रॉपर्टी अशा आहेत जिथे हजारो फ्लॅट रिकामे आहेत. यामध्ये असणाऱ्या अनेक प्रॉपर्टीजच्या किंमती गेल्या ५ वर्षांपासून स्थिर आहेत. किंमती वाढल्या तरी ही वाढ फार किरकोळ असेल. अशा परिस्थितीत सामान्य सोसायटीमध्ये ५ ते सहा हजारात २ bhk फ्लॅट सहज घेता येऊ शकतो.

२ सुरवातिला करा सिस्टेमॅटिक इन्वेशण्टमेण्ट प्लॅन (SIP) मध्ये गुंतवणूक
अशाप्रकारे २० हजार रुपयांच्या संभावित EMI पासून १४ हजारांची बचत होईल. ही रक्कम तुम्ही इक्विटी म्युचुअल फंडमध्ये गुंतवू शकता. ही गुंतवणूक तुम्हाला २० वर्षांपर्यंत करावी लागेल. आतापर्यंत अनेक म्युचुअल फंडमधून १६ % परतावा मिळाला आहे. पण आपण प्रतिवर्ष १२ % समजू. तरीही तुमच्याजवळ २० वर्षात १.३८ कोटी रुपये फंड तयार होईल.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like