‘लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है’, मनसेची बॉलिवूडच्या कलाकारांवर ‘आगपाखड’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – देशात भयानक पूरस्थिती आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागात महापुराचा हाहाकार असताना समस्त महाराष्ट्रातून मदतीचा मोठा ओघ कोल्हापूर, सांगलीसाठी येत आहे. राज्यातील अनेक सामाजिक संस्था, मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. प्रत्येकजण शक्य त्या पद्धतीने पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा प्रयत्न करतोय. शिर्डी देवस्थांपासून ते मराठी कलाकारांपर्यंत प्रत्येकाने या आपत्तीत मदत कार्यासाठी वसा उचलला आहे. मात्र एरवी मुलाखतीमधून भूमिपुत्र असल्याचे दावे करणारे बॉलिवूड कलाकार कुठेच दिसत नाहीयेत.

महाराष्ट्र आलेल्या संकट सर्व जण बघताहेत मात्र बॉलिवूड कलाकार मदतकाऱ्यांमध्ये कुठेच दिसत नाहीए. त्यामुळेच महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेने याबाबत ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून सांगणारे ते बाॅलीवूड कलाकार या संकटकाळात कुठे आहेत ? असो, आम्ही आमच्या मातीतल्या मायेच्या माणसांसाठी सदैव झटत राहू. अशा शब्दात मनसेने आपला संताप व्यक्त करत समस्त बॉलिवूड समोर एक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर लानत हे उनपर, जीनके पास दानत नहीं अशा शब्दात ट्विटरद्वारे सर्व बॉलिवूड कलाकारांना झापले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like