१७०० रुपयांची लाच घेताना ‘मनरेगा’चा Technical Officer ‘अँटी करप्शन’च्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – आईच्या नावावर असलेल्या फळबाग योजनेंतर्गत कुशल बिलाच्या देयकांवर गट विकास अधिकारी पंचायत समिती धुळे यांची स्वाक्षरी घेऊन ते ऑनलाइन जमा करण्यासाठी १७०० रुपयांची लाच घेताना मनरेगाच्या तांत्रिक अधिकाऱ्याला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले.

शशिकांत जयसिंग गिरासे (वय ३०, तांत्रिक अधिकारी, वर्ग ३, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना,पंचायत समिती कार्यालय धुळे रा.३०४अ, अपार्टमेंट, वाडीभोकर रोड,पंचायत समिती कार्यालयासमोर, धुळे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या आईच्या नावे असलेल्या फळबाग योजने अंतर्गत कुशल बिलाची १४ हजार ५०० रुपयांच्या देयकांवर गट विकास अधिकारी यांची स्वाक्षरी घेऊन ते ऑनलाइन जमा करण्यासाठी गिरासे यांनी १७०० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने याची तक्रार अँटी करप्शनच्या पथकाकडे केली. यानंतर अँटी करप्शनच्या पथकाने पडताळणी करून सापळा रचला. जयसिंग गिरासे याला पथकाने १७०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.