MNS Aaditya Shirodkar | …म्हणून मी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला – आदित्य शिरोडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) दृष्टीकोनातून मनसेला पुन्हा एकदा शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर (MNS Aaditya Shirodkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं आहे. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. आदित्य शिरोडकर (MNS Aaditya Shirodkar) यांच्या अचानक पक्ष सोडण्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे. आता शिरोडकर यांनी मनसे सोडण्याचे कारण सांगितलं आहे.

आदित्य शिरोडकर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, बाळा नांदगावकर यांच्याशी शाब्दिक चकमक हे एकच मनसे (MNS) सोडण्याचं कारण नाही. त्या वादाला काही कारण होतं. पक्षातील तरुण पदाधिकारी काय करतात ? विद्यार्थी सेना ही महाविद्यालये, विद्यापीठात नेमकं काय कम करते ? याबाबत वरिष्ठ नेत्यांना माहिती घेणं, मार्गदर्शन करणं अपेक्षित असतं. ते आमच्याकडे होत नव्हतं. आमच्या कामाची कुठलीही माहिती न घेता परस्पर मीडियाला जाऊन विद्यार्थी सेना काम करत नाही असं सांगण्यात आलं होतं. यावरुन आमची शाब्दिक चकमक झाली होती.

मला त्या खोलात जायचे नाही

वाद होतच असतात. मागच्या अनेक वर्षांत असे अनेक प्रसंग आले. माझा निर्णय हा काही काल-परवा झालेला नाही. बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांच्यासोबत झालेला वाद समोर आला, पण सगळ्याच गोष्टी मला मीडियासमोर सांगता येणार नाहीत. प्रवीण दरेकर, वसंत गिते, शिशिर शिंदे ही मंडळी मनसेतून गेली. त्यालाही काही कारणं होती. मला त्या खोलात जायचं नाही, असे शिरोडकर यांनी सांगितले.

 

शेवटी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला

पक्ष सोडण्यापूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत चर्चा झाली होती का ? यावर शिरोडकर यांनी नकारार्थी उत्तर दिलं. माझ्या बाबतीत जे काही होत होतं, ते गुपित नव्हतं. ते पक्षाला दिसत होत. हे चित्र बदलेल म्हणून मी वाट पाहिली आणि शेवटी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे माझा होता. मी राज ठाकरेंशी चर्चा केली नाही, असेही शिरोडकर यांनी स्पष्ट केलं.

म्हणून शिवसेनेत प्रवेश केला
मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची कार्यपद्धत मला भावली.
त्यातून प्रेरित होऊनच मी शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला.
आता यापुढचं समाजकार्य शिवसेनेत राहूनच करेन.
जी जबाबदारी दिली जाईल, ती पार पाडेन, असं शिरोडकर यांनी सांगितले.
तसेच वडील राजन शिरोडकर हे देखील माझ्यासोबत शिवसेनेत आले आहेत.
काल ते आजारी असल्याने प्रवेशाच्यावेळी उपस्थित नव्हते.
येत्या सात ते आठ दिवसांत ते पक्षप्रमुखांची भेट घेतील अशी माहिती आदित्य शिरोडकर यांनी दिली.

Web Titel :- MNS Aaditya Shirodkar | thats why i quit mns says aditya shirodkar

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

Social Media News | धोक्याची घंटा ! तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर करत असाल ‘हे’ काम, तर 24 तासात डिलिट केले जाईल अकाऊंट