मराठीसाठी मनसे आक्रमक ! पुण्यात ‘फोन पे’चे अन्य भाषेतील 5000 स्टिकर जाळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  मराठी भाषेसाठी आग्रह धरणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता अमेझॉननंतर आपला मोर्चा ‘फोन पे’ कंपनीकडे वळविला आहे. शुक्रवारी (दि. 26) पुण्यात आक्रमक पवित्रा घेत फोन पे कंपनी विरोधात आंदोलन केले. कंपनीने मराठी स्टिकरचा वापर न करता कन्नड, तेलगु, गुजराती स्टिकर असंख्य आस्थापनावर लावले होते. हे स्टीकर काढून ते जाळून टाकत निषेध व्यक्त केला आहे. यावेळी 5 हजार पेक्षा अधिक स्टिकर जाळण्यात आले.

यावेळी बाणेर प्रभाग अध्यक्ष अनिकेत मुरकुटे, उपविभाग अध्यक्ष रमेश उभे, उपविभाग अध्यक्ष अशोक दळवी, शाखा अध्यक्ष अभिजीत चौगुले, गणेश चव्हाण उपस्थित होते. यावेळी मसनेच्या पदाधिका-यांनी बाणेर येथील फोन पे कंपनीच्या कार्यालयाला भेट देऊन 15 दिवसांत अन्य भाषेतील पुणे परिसरातील चिकटवलेले स्टिकर काढुन फक्त मराठीतच लावावेत याबाबतचे निवेदन दिले आहे.