संजय निरुपम यांच्याविरोधात मनसेची आक्रमक पोस्टरबाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

उत्तर भारतीय माणूस मुंबई आणि महाराष्ट्र चालवतो. त्यांनी ठरवले तर महाराष्ट्र ठप्प होईल, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय निरुपम हे परप्रांतीय भटका कुत्रा असून, परप्रांतीय मतांवर डोळा ठेवून ते अशी विधाने करत आहेत, अशी पोस्टरबाजी मनसेकडून सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e2841172-cab4-11e8-bc73-fd0efc70da53′]

संजय निरुपम यांच्या वक्तव्याचा निषेध सध्या मनसे ही सोशल मिडियावरुन करत असली तरी त्याचा प्रत्यय लवकरच रस्त्यावर दिसून येईल, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मुंबईत रेल्वेच्या परिक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय तरुणांना शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेने कल्याण स्टेशनवर मारहाण केली होती. त्यावेळी राज ठाकरे हे विद्यार्थी सेनेचे प्रमुख होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला असला तरी मुंबई, ठाण्यातील उत्तर भारतीय हे मनसे नेहमीच टारगेट ठरले आहे. काही निमित्त मिळताच रिक्षा, टॅक्सीचालक तसेच भाजी विक्रेते यांना मनसेचे कार्यकर्ते टारगेट करुन त्याची तोडफोड केली जाते. असा आजवरच इतिहास आहे. त्यामुळे संजय निरुपम यांच्या वक्तव्यामुळे मनसेच्या उत्तर भारतीयांविरोधाला आणखी धार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

[amazon_link asins=’B008XT42JU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f2024890-cab4-11e8-8f10-4bf4c74de7cc’]

नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना निरुपम यांनी उत्तर भारतीय मुंबई चालवतात, त्यांनी ठरवले तर महाराष्ट्र ठप्प होईल, असे वादग्रस्त विधान केले होते. उत्तर भारतीय मंडळी महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रात सक्रीय आहेत. हीच माणसे पूर्ण मुंबई चालवतात. त्यांनी जर ठरवले तर सर्वकाही ठप्प होऊ शकते. त्यामुळे त्यांना काम बंद करायला भाग पाडू नका, असे निरुपम यांनी म्हटले होते.

निवृत्त न्यायाधीशांच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावली

उत्तर भारतातून महाराष्ट्रात आलेला माणूस सर्व कामे करतो. तुम्ही कोणतेही क्षेत्र सांगा. त्यामध्ये उत्तर भारतीय सक्रीय आहेत. उत्तर भारतीय माणूस रिक्षा-टॅक्सी चालवतो. फळे-भाजी विकतो. बांधकाम क्षेत्रातील बहुतांश मजूर हे उत्तर भारतीय आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे, असे निरुपम म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्र उत्तर भारतातील मंडळीच चालवतात, असा दावादेखील त्यांनी केला. उत्तर भारतीय पूर्ण मुंबई चालवतात. त्यांनी जर ठरवले, तर मुंबई ठप्प होऊ शकते. जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी ठरवले, तर मुंबईकारांना जेवायला मिळणार नाही, असे निरुपम म्हणाले होते. त्यामुळे आम्हाला काम बंद करायला भाग पडू नका, असा अप्रत्यक्ष इशारादेखील त्यांनी दिला होता.