उलट प्रवास करणाऱ्यांविरोधात मनसे आक्रमक 

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन 

अंबरनाथ लोकलमध्ये उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीहून उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. उलट बसून येणाऱ्या प्रवाशांना मनसे कार्यकर्त्यांनी अंबरनाथ स्टेशनवर हुसकावण्याचा प्रयत्न केला.

[amazon_link asins=’B077PWBC7J,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b7524ad-b0d6-11e8-bf31-4376407fa603′]

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी लोकलला प्रचंड गर्दी असल्यानं अनेक प्रवासी अंबरनाथवरुन सीएसटीकडे जाणारी ट्रेन पकडण्यासाठी उल्हासनगर, विठ्ठलवाडीवरुन अंबरनाथकडे जाणारी ट्रेन पकडतात. मग अंबरनाथला पोहोचलेली ट्रेन परत सीएसटीकडे जाते. त्यावेळी उल्हासनगर, विठ्ठलवाडीहून चढलेले लोक आधीपासूनच ट्रेनमध्ये असतात. त्यामुळे अंबरनाथ हे पहिलं स्टेशन असूनही अनेकांना जागा मिळत नाहीत.या तक्रारी वाढल्यामुळे प्रवाशांनी मनसेकडे गाऱ्हाण मांडलं. त्यानंतर मनसेने आज उलट प्रवास करणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
उलट बसून येणाऱ्या या प्रवाशांना मनसेने आज चांगलीच अद्दल घडवली. मनसेच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांनी अंबरनाथ स्थानकात आलेल्या लोकलमधील या प्रवाशांना हुसकावून लावले. या प्रवाशांना लोकलमधून खाली उतरवत इतर प्रवाशांना जागा करून दिली. त्यामुळे अंबरनाथ स्थानकात तणाव निर्माण झाला होता.
लोकलमध्ये प्रवाशांचे अनेक ग्रुप असतात, हे ग्रुप इतर सहकाऱ्यांचीही जागा अडवून ठेवतात आणि दुसऱ्या प्रवाशांना बसू देत नाहीत. शिवाय ट्रेन सुरू झाल्यावर पत्ते खेळणे, धिंगाणा घालणे असले प्रकार लोकलमध्ये सुरू असतात. ठाणे गेल्यानंतरही हे प्रवासी दुसऱ्या प्रवाशांना बसायला जागा देत नाहीत. त्यामुळे अनेक प्रवाशांना तास न् तास उभ्याने प्रवास करावा लागतो. परिणामी स्त्रिया, वृद्ध प्रवासी आणि आजारी प्रवाशाची  गैरसोय होते. केवळ अंबरनाथच नव्हे तर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील अनेक स्थानकांमध्ये हे प्रकार सर्रास पाह्यला मिळतात.