प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होताच बाळासाहेब थोरातांनी मनसेविषयी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसानामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यात काँग्रेसने मोठे पाऊल घेत ५ कार्यकारी अध्यक्षांची नेमणूक केली आहे. तर प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेस बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार घेतात थोरात यांनी मनसेबद्दल पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मनसेसह त्यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीबाबतही वक्तव्य केले. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर थोरात यांनी नगरमध्ये पत्रकार परिषदेत आपेल मत स्पष्ट केले.

लोकशाही आणि पुरोगामी मुल्य टिकवण्यासाठी आताचं सरकार घालवणे गरजेचे आहे. हे सरकार घालवण्यासाठी सर्वांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत तर आहोतच पण वंचित आघाडी आणि मनसेलाही आगामी निवडणुकीत सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीत यशस्वी होणार आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात आघाडीचं सरकार येणार, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. आमच्या पक्षातून काही लोक गेले. पण जेव्हा कोणी पक्ष सोडतो, तेव्हा त्याच्याजागी नवीन लोकांना संधी मिळून तरुण नेतृत्व निर्माण होत असते. त्यामुळे गेलेल्या लोकांची चिंता नाही. आम्ही सर्व नेते आता एकदिलाने काम करून आगामी काळात महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणू, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मानहानीकारक पराभावाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसंच त्यानंतर एकेक करून अनेकांनी राजीनामे दिले. त्यात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राजीनामा दिला होता. त्यानंतर आता त्यांच्या जागेवर बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या