MNS Avinash Jadhav | ‘…तर मग मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंवरही गुन्हा दाखल करा’; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आक्रमक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Avinash Jadhav | मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांना उत्तरसभेत (Uttarsabha) कार्यकर्त्यांनी तलवार भेट दिली होती. राज ठाकरे यांनी मंचावर ती तलवार (Sword) म्यानातून बाहेर काढत उंचावली, म्हणून त्यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत (Under the Arms Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aaditya Thackeray) यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे.

 

जर राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल व्हायलाच हवा. तलवार दाखवणे ही एक प्रकारची संस्कृती आहे, त्यामुळे जर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, असं मनसे नेते अविनाश जाधव (MNS Avinash Jadhav) यांनी म्हटलं आहे.

 

सरकारच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे.
राज ठाकरेंना कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात अडकवण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतोय.
अनेक नेत्यांनी याआधी सभेमध्ये तलवारी दाखवल्या आहेत मग आजच का तुम्हाला राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करावासा वाटला ?,
असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे.

 

दरम्यान, राज ठाकरे यांच्यासह 10 जणांविरोधात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये (Naupada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- MNS Avinash Jadhav | if raising a sword is crime file a case against cm uddhav thakceray and aditya says mns avinash jadhav

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा