MNS-BJP Alliance | मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याने घेतली फडणवीसांची बंगल्यावर जाऊन भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  आगामी काळात राज्यात मनसे-भाजप युती (MNS-BJP Alliance) होणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी सुरु होत्या. याच दरम्यान झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पालघरमध्ये मनसे-भाजपची युती (MNS-BJP Alliance) पहायला मिळाली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal elections) मनसे-भाजप युती होणार असल्याची चर्चा रंगली. अशातच दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांचे एकमेकांच्या घरी जाणं-येण वाढले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीला त्यांच्या बंगल्यावर पोहचले आहेत. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक (BJP core committee meeting) आज बोलावण्यात आली आहे.
या बैठकीपूर्वीच बाळा नांदगावकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर (Sagar) बंगल्यावर पोहचले.
दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीच्या वेळी देवेद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर आशिष शेलार (Ashish Shelar) आधीच पोहोचले होते.
फडणवीसांची भेट घेतल्यानंतर नांदगावकर (MNS-BJP Alliance) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

बाळा नांदगावकर म्हणाले, मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो होतो. फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीच फोन केला होता.
त्यामुळे भेटण्यासाठी वेळ दिला होता. दोन राजकारणी एकत्र भेटले तर राजकीय चर्चा होतेच, असंही नांदगावकर म्हणाले. तसंच आर्यन खान (Aryan Khan) अटक प्रकरणावरुन अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत.
एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याची माहिती समोर आली आहे, हे योग्य नाही, असं मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली होती.
या भेटीनंतर मनसे आणि भाजपमध्ये हालचालींना वेग आला.
पालघर जिल्हा परिषद निवडणुक (Palghar Zilla Parishad Election) मनसे आणि भाजपने एकत्र लढवली होती.
त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत हे दोन पक्ष एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे.

 

Web Title : MNS-BJP Alliance | mns leader bala nandgaonkar meet devendra fadnavis house at mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये होणार मोठा बदल, लवकरच येणार ‘हे’ नवं फिचर

Car Buying Guide | नवीन गाडी खरेदी करत आहात का? ‘या’ 5 पॉईंटचा आवश्य विचार करा, अन्यथा घेतल्यानंतर करावा लागेल पश्चाताप!

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,616 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी