MNS | भाजप-मनसे-शिंदे युती होणार? भाजपचा मास्टर प्लॅन तयार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सत्तांतर झाल्यावर मनसे (MNS) आणि भाजप शिंदे युती होणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या. कारण गेले अनेक दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (Mumbai Municipal Corporation Elections) शिवसेनेच्या (shivsena) विरोधात तिनही पक्ष एकत्र उभे टाकणार का, याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गेले अनेक दिवस राज ठाकरे आणि भाजप (BJP) शिंदे यांचे सूत जुळले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत भाजप युती करणार की, शिंदे गट (Shinde Group), या प्रश्नावर आता उत्तर मिळाले आहे. भाजपकडून मुंबईतील अनेक खासगी कंपन्यांकडून मनसेसोबत युती करण्यासाठी सर्वेक्षणे केली जात आहेत. आता या सर्वेक्षणातून आणखी एक महत्वाची माहिती हाती लागली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने मास्टर प्लॅन (BJP Master Plan) तयार केला आहे. भाजप मनसेसोबत थेट युती करणार नाही, पण त्यांना बाहेरुन पाठिंबा देणार आहे. आणि शिंदे यांचा गट मनसेसोबत युती करुन त्यांना काही जागा देणार आहे, अशी माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप मनसेला अदृश्य हातांनी मदत करणार आहे. शिंदे आणि मनसेच्या ताकदीनुसार त्यांना जागा देण्यात येणार आहेत.

मनसेकडे मुंबईत अनेक प्रभांगांमध्ये मोठे उमेदवार नाहीत. त्यामुळे त्यांचा वापर शिवसेनेची मते फोडण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच ज्या जागा मनसे जिंकू शकण्याची शक्यता आहे, असा ठिकाणी भाजप आपला उमेदवार देणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.

त्यामुळे आगामी काळात जर भाजप शिंदे आणि मनसे एकत्र आली, तर शिवसेनेच्या ठाकरे गटाला
(Thackeray Group) अनेक ठिकाणी अटीतटीची लढाई द्यावी लागेल.
मागील महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंचे फार कमी नगरसेवक निवडून आले होते.
आता भाजप आणि मनसेच्या पाठिंब्यामुळे आणखी नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आगामी काळात मनसेला भाजप आणि शिंदेंसोबत युतीचा फायदा होणार आहे.

Web Title :- MNS | bjp is going to help mns with invisible hands in mumbai municipal corporation elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IND vs NED | ‘या’ भारतीय फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करणे विराटपेक्षा अवघड आहे, नेदरलँड्सच्या गोलंदाजांची प्रतिक्रिया

Katrina Kaif | नवर्‍याविषयी बोलताना कतरिना कैफने सांगिातले बेडरुम सिक्रेट, म्हणाली – ‘रात्री झोप येत नाही तेव्हा मी त्याला…’