राज ठाकरेंसोबत मनसे कार्यकर्ते ED च्या कार्यालयावर जाणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच आपल्या विरोधकांवर मार्मिक पद्धतीने टीका करत असतात. नुकतेच राज यांना ईडीने नोटीस बजावत २२ तारखेला उत्तर देण्यास सांगितले आहे. या नोटीस नंतर मनसेच्या तसेच अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती. मात्र आता मनसे कार्यकर्त्यांनी देखील या नोटीसला मार्मिक पद्धतीने उत्तर देण्याचे ठरवले आहे.

२२ ऑगस्ट रोजी राज यांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मनसेची महत्त्वाची बैठक पक्षाच्या ‘राजगड’ मुख्यालयात पार पडली. त्यात भाजपच्या दबावाच्या राजकारणाला न डगमगता पण, शांततेच्या मार्गानं उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज ठाकरे ज्या दिवशी ‘ईडी’च्या समोर चौकशीला जातील, त्याच दिवशी राज्यभरातील मनसेचे कार्यकर्तेही ‘ईडी’च्या कार्यालयासमोर हजर राहतील, असं ठरलं आहे. राज यांना साडेअकरा वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानं कार्यकर्त्यांना दहा वाजताची वेळ देण्यात आली आहे. त्यावेळी जमेल त्या मार्गाने, जमेल तसे ‘ईडी’च्या कार्यालयासमोर यावे, असं सांगण्यात आलं आहे, याबाबतची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

या आधी राज ठाकरेंनी अनेकदा विरोधकांना मार्मिक पद्धतीने उत्तरं दिली आहेत. आता कार्यकर्ते सुद्धा शांततेच्या मार्गाने येऊन आपले समर्थन देणार आहेत. आता सरकार या कार्यकर्त्यांना काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त –