MNS Chief Raj Thackeray | नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाहीत, मनसे प्रमुख राज ठाकरेंचे परखड मत

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी महापालिका निवडणुकांच्या (Municipal Elections) पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे आज नाशिक दैऱ्यावर आले आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. आरबीआयने (RBI) शुक्रवारी दोन हजार रुपयांची नोट बंद (2000 Rupees Note) करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरुन राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार निशाणा साधला. जर तज्ज्ञांशी बोलून दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला असता तर आज ही वेळच आली नसती, असं राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी म्हटलं.

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) पुढे म्हणाले, आता लोकांनी परत बँकेमध्ये पैसे टाकायचे, परत तुम्ही नवीन नोटा आणणार असं सरकार चालतं का? असे प्रयोग होतात का? अशा शब्दात राज ठाकरेंनी मोदी सरकारला सुनावले. त्यावेळी जेव्हा नोटा आणल्या होत्या तेव्हा एटीएममध्ये जात नव्हत्या. म्हणजे नोटा एटीएममध्ये जात आहेत की नाहीत हे देखील पाहिलं नव्हतं. नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात, असं परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

हिंदू धर्म इतका कमकुवत आहे का?

त्र्यंबकेश्वरमधील वादावर (Trimbakeshwar Temple) बोलताना राज ठाकरे म्हणाले, हा तिथल्या लोकांचा
प्रश्न आहे. इतर धर्मांचा माणूस आपल्या मंदिरात आला तर भ्रष्ट होण्याइतका आपला धर्म कमकुवत आहे का?
मी देखील अनेक दर्ग्यात गेलो आहे, असं ठाकरेंनी सांगितलं. गड किल्ल्यांवरील दर्गे हटवले पाहिजे.
चुकीच्या गोष्टींवर प्रहार केलाच पाहिजे. मराठी मुसलमान जिथं राहात तिथं दंगली होत नाहीत, असंही राज ठाकरे म्हणाले.

शॅडो कॅबिनेट पुन्हा कार्यान्वित करणार

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहे. शॅडो कॅबिनेट (Shadow Cabinet)
पुन्हा एकदा कार्यन्वीत करण्यात येईल. नाशिकमध्ये आमची सत्ता असताना जेवढी कामे झाली तेवढी कामं पूर्वी
आणि नंतर कधीच झाली नाहीत, असा दावा राज ठाकरे यांनी यावेळी केला.

Web Title : MNS Chief Raj Thackeray | a decision like demonetisation cannot be afforded by the country does the government work like this raj thackerays question

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | 50 लाखाच्या खंडणी प्रकरणी चौघांना अटक ! कंपनी चालकाकडे Whatsapp Call करून केली होती ‘डिमांड’

पुन्हा नोटबंदी ! 2 हजाराची नोट बंद होणार, ‘या’ तारखेपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत