MNS Chief Raj Thackeray Appeal | मनसेची माघार नाहीच ! ‘भोंग्यावर अजान झाली तर हनुमान चालिसा लावाच’; राज ठाकरेंचं आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray Appeal | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray Appeal) यांनी सांगितल्याप्रमाणे ईदनंतर सर्व देशातील हिंदूंंना आवाहन केलं आहे. जिथे मशिदीवर भोंगे वाजविले जातील (Loudspeakers On Mosque), तिथे हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाजवा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज ईद असल्यामुळे राज ठाकरेंनी महाआरती (Mahaarati) रद्द करत पुढचा निर्णय उद्या कळवतो असं सोमवारी सांगितलं म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी पत्रकाद्वारे सर्वांना आवाहन केलं आहे.

 

मशिदींवरचे भोंगे (Loudspeakers) 4 मेपर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितलं होतं. परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. या देशातल्या राज्य सरकारांतला प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देतोय. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, रुग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी यांना भोंग्यांच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की “रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल, परंतु 365 दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी ही रोज घ्यावी लागेल”, असं पत्रकामध्ये म्हटलं आहे. (MNS Chief Raj Thackeray Appeal)

 

https://twitter.com/RajThackeray/status/1521498072517582849/photo/2

ध्वनिक्षेपक किती क्षमतेने लावावा त्याबाबतच्या मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितलेल्या आहेत. या मर्यादा मी तुम्हाला मुद्दामहून सांगत आहे- लोकवस्ती असेल त्या भागात कमीतकमी 10 डेसिबल आणि जास्तीतजास्त 45 ते 55 डेसिबल आवाजात ध्वनिक्षेपक लावता येतो. लक्षात घ्या, 10 डेसिबल म्हणजे आपण कुजबुज करतो तो आवाज आणि 55 डेसिबल म्हणजे आपल्या घरातल्या मिक्सरचा आवाजाइतका असल्याचं पत्रकात सांगितलं आहे.

 

आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल,
तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या 100 या क्रमांकावर
सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांचा त्रासाबाबत तक्रार करावी. रोज करावी, असं आवाहनही राज ठाकरें यांनी केलं आहे.

 

Web Title :-  | mns chief raj thackeray appeal to mns karyakarta over removing loudspeaker from the mosque hanuman chalisa

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

PMPML | पीएमपीएमएलच्या संचालकपदावर महापौर, स्थायी समिती अध्यक्ष कायम ! वेबसाईटच अपडेट न केल्याने गोंधळ

Akshaya Tritiya 2022 | श्री लक्ष्मी माता उत्सवानिमित्त मंदिरात फळांची आरास

Raj Thackeray | राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे नेत्याचं मोठं विधान; म्हणाले – ‘पोलिसांनी जर अटक केली तर…’