MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे हाजिर हो!, ‘या’ तारखेला राज ठाकरे परळी न्यायालयात हजर राहणार, काय आहे प्रकरण?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना परळीच्या न्यायालयाने (Parli Court) समन्स बजावले आहे. 2008 साली राज ठाकरे यांना अटक (Arrest) केली होती. या अटकेच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी परळी-गंगाखेड रोडवर एसटी महामंडळाच्या (ST Corporation) बसवर दगडफेक (Stone Throwing) केली होती. याप्रकरणी राज ठकारे यांना परळी न्यायालयाने 12 जानेवारीच्या सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) प्रत्यक्ष कोर्टात हजेरी लावतील, असे सांगण्यात येत आहे.

परळीमध्ये दाखल गुन्ह्यात कोर्टाने समन्स बजावला होता. त्यामुळे राज ठाकरे येत्या 12 जानेवारीला हजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यावर 2008 मध्ये राज्यभर गुन्हे (FIR) दाखल झाले होते. त्यावेळी परळीतही गुन्ह्यांची नोंद झाली होती. या खटल्याच्या सुनावणीला ते दोन वेळा गैरहजर राहिले होते. त्यामुळे कोर्टाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले होते.

काय आहे प्रकरण?

राज ठाकरे यांना मुंबईत ऑक्टोबर 2008 मध्ये अटक केली होती. याचे परिणाम राज्यभर उमटले होते. या अटकेच्या विरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी तोडफोड, बसेसवर दगडफेक झाली होती. असाच प्रकार परळी मध्ये देखील घडला होता. परळीतील धर्मापुरी पॉईंट (Dharmapuri Point) येथे एसटी बसेसवर दगडफेक झाली होती. त्यामध्ये एसटी बसचे नुकसान झाले होते. या घटनेनंतर जमावबंदीचे आदेश (Prohibition Order) मोडणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि चिथावणीखोर वक्तव्य करणे हे गुन्हे मनसेच्या काही कार्यकर्त्यांसह राज ठाकरेंवर दाखल केले होते.

परळी पोलीस ठाण्यात (Parli Police Station) गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल (Charge Sheet) करण्यात आले. यानंतर राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांना जामीन मंजूर (Bail Granted) झाला. परंतु न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध 6 जानेवारी 2022 ला अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) काढत, 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले होते.

या प्रकरणामधील मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात हजेरी लावल्याने अजामीनपात्र वॉरंट रद्द केलं होतं.
मात्र 13 एप्रिल 2022 ला दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले.
आता पुन्हा एकदा 12 जानेवारीला हजर राहण्यासाठी राज ठाकरे यांना परळी न्यायालयाने समन्स बजावलं आहे.
त्यानुसार ते न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title :-MNS Chief Raj Thackeray | beed parli court order present raj thackeray 12 january over st bus case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hair Fall | ‘हेयर फॉल’च्या समस्येने असाल त्रस्त, तर असा करा कांद्याचा वापर, जाणून घ्या याचे ३ फायदे!

Healthy Oils | कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करण्यासाठी जेवणात या ५ निरोगी तेलांचा करा वापर

Winter Health | हिवाळ्यात लवंग आणि काळी मिरी आरोग्यासाठी अतिशय आवश्यक, सेवन केल्याने होईल ‘इम्यून सिस्टम’ मजबूत!