MNS Chief Raj Thackeray | मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर आज भाजपचा बडा नेता राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या (Andheri East by-Election) पार्श्वभूमीवर या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आज भाजपचे मुंबई अध्यक्ष (BJP Mumbai President) आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ही भेट महत्वाची मानली जात आहे.

 

 

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात हालचालींना आता वेग आला आहे. भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची भाजप नेते आशिष शेलार यांनी भेट घेतली. बीसीसीआय खजिनदार (BCCI Treasurer) झाल्यानंतर शेलार यांनी पहिल्यांदाच राज ठाकरे यांची भेट घेतली. भाजपकडून मुंबई महापालिकेची जबाबदारी शेलार यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे.

 

सहानभूती कशाची पाहिजे?

दरम्यान, मनसे सरचिटणीस (MNS General Secretary) संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी थेट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. संदीप देशपांडे पत्रात लिहितात, तुमचे आमदार फुटले तुम्हाला सहानभूती, तुमचं चिन्ह गेलं तुम्हाला सहानभूती ठीक आहे पण आम्ही गेली 25 वर्ष रस्त्यात नाही खड्यात चालतोय. आम्हाला सहानभूती कधी मिळणार? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.

 

Advt.

कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला? कोरोना काळात लपून बसलात त्याची की, पन्नास लाखांचं घड्याळ मिळालं त्याची?
महापौरांच्या मुलाला कोरोना काळात कंत्राट दिलं त्याची सहानभूती पाहिजे की,
लोकांचे कोरोनामध्ये हाल होत असताना रात्री उशिरापर्यंत पब ना परवानगी दिली त्याची सहानभूती पाहिजे?
कोरोनामध्ये जनतेला रुग्णालयात बेड मिळत नव्हता त्याची सहानभूती पाहिजे की सामान्य माणसाला हॉस्पिटल्स नि
बिलामध्ये लुटलं त्याची सहानभूती पाहिजे? असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे.

 

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | bjp mla ashish shelar met
mns leader raj thackeray at mumbai Maharashtra Politics news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा