MNS Chief Raj Thackeray | ‘बरबटलेलं राजकारण बदलायचं असेल तर…’, राज ठाकरेंनी तरुणांना केलं ‘हे’ आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजकारणात (Politics) या, आम्ही संधी द्यायला तयार आहोत. राजकारण म्हणजे फक्त निवडणुका (Elections) नाहीत. राजकारणातही अनेक अंग आहेत. तुम्ही राजकारणाच्या कोणत्याही कक्षेत योगदान देऊ शकता, असे म्हणत तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे. दरम्यान, पुण्यातील एका कार्य़क्रमात बोलताना देखील राज ठकरे यांनी तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले होते.

राजकारणात यायचं म्हणजे फक्त निवडणूक लढवायची असं नाही. राजकारणाला अनेक अंग आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या क्षेत्रात आपलं योगदान देऊ शकता. आज अनेक डॉक्टर असे आहेत की ज्यांनी डॉक्टरकी सोडून अभिनयात करिअर केले. मग इतर क्षेत्रातील तरुण राजकारणात का येऊ शकत नाहीत? असा सवाल राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पुण्यातील कार्यक्रमात केला होता.

बरबटलेलं राजकारण बदलायचं असेल तर मी महाराष्ट्राला आवाहन करु इच्छितो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम
करत असाल, कोणत्याही वयोगटाचे असा राजकारणात या… मी संधी द्याययला तयार आहे, असे राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

Web Title :– MNS Chief Raj Thackeray | come to politics i am ready to give a chance urged mns leader raj thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | सोनं खेरेदीने नवीन वर्षाचे स्वागत करण्याची सुवर्णसंधी, सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा दर

Ajit Pawar | ‘लाड चाललेत नुसते सगळे…’ असे म्हणत अजित पवार भाजपच्या ‘या’ मंत्र्यावर संतापले, सुनावले खडे बोल

Madhura Deshpande | तब्बल 3 वर्षांनी अभिनेत्री मधुरा देशपांडे दिसणार ‘या’ मालिकेत; साकारणार ‘हि’ महत्त्वाची भूमिका