‘राज ठाकरेंना निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही, पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन मनसेप्रमुख राज ठाकरे, राहुल गांधी यांच्याबाबत महत्वाचं विधान यावेळी केलं. “निवडणुकीमध्ये त्यांना हवं तसं यश मिळालं नसेल, मात्र याचा अर्थ तरुणांचा राज ठाकरेंबद्दलचा क्रेज गेला आहे, असं मी मानणार नाही.

राज ठाकरे हा त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. राज ठाकरे स्वतंत्रपणे आपली मते मांडतात. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या तरुणांचा एक वर्ग आहे.”

अजूनही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसजनांमध्ये आहे…
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी काय किंवा राहुल गांधी काय हे दोघेही त्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत असल्याने पक्षातील बहुसंख्य लोक त्यांच्या विचाराचे आहेत आणि ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. कुठल्याही राजकीय पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची मान्यता पक्षसंघटनेत आणि लोकांमध्ये किती आहे, हे पाहणं आवश्यक असतं. आज काँग्रेसमध्ये रँक अँड फ्रँकची स्थिती लक्षात घेतली तर अजूनही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसजनांमध्ये आहे.

यावेळी देश राहुल गांधींचे नेतृत्व मानायला तयार आहे का ?
बराक ओबामा यांनीही आपल्या पुस्तकात राहुल गांधींबाबत केलेल्या उल्लेखाबाबतही पवार यांनी प्रतिक्रिया दिली. बराक ओबामा यांनी त्यांची मतं मांडली असतील. पण सगळ्यांची मतं आपण मान्य केली पाहिजेत असं नाही. आपल्या देशातील नेतृत्वाबाबत मी काही बोलेन, पण बाहेरील देशातील नेतृत्वाच्या प्रश्नाबाबत मी फारशी चर्चा करणार नाही. त्यांच्यामध्ये काही प्रश्न आहेत. त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे.

मर्यादा ओलांडली
दुसऱ्या देशातील नेतृत्वाबाबत बोलणार नाही. ओबामा यांनी ही मर्यादा ओलांडली आहे. आम्ही प्रत्येकाचा दृष्टिकोन स्वीकारायला हवा. आमच्या देशातील नेतृत्वाबाबत आम्ही काहीही म्हणू शकतो.