MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल; आता नेमके पर्याय काय ?, कोणती कलम लावण्यात आली ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरुन इशारा दिल्याने राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमधील (Aurangabad) सभेमध्ये 12 अटींचे उल्लंघन केल्याने राज ठाकरे आणि आयोजक राजीव जावळीकर (Rajiv Jawalikar) विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात (City Chowk Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता (CP Nikhil Gupta) यांनी सभेला सोळा अटी घालून परवानगी दिली होती. आता आयपीसी कलम (IPC Clause) 116, 117, 153 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे जामीनपात्र गुन्हे आहेत. राज ठाकरे यांच्याविरोधात आयपीसी 153 नुसार गुन्हा दाखल असला तरी हिंसाचाराची घटना न घडल्याने त्यांना 153 (अ) हे कलम लावण्यात आले नाही. या कलमानुसार दाखल होणारा गुन्हा अजामीनपात्र (Non-Bailable) आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासमोर 2 पर्याय आहेत. असं सांगण्यात येत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो.
अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाल्यास राज ठाकरे यांच्यावर अटकेची कारवाई होणार नाही.
तसेच, पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरला (FIR) न्यायालयात आव्हान देऊन हा एफआयआर रद्द करण्याची मागणी राज ठाकरे यांच्याकडून केली जाऊ शकते.
तसेच त्यांच्याकडून आता कोणत्या पर्यायाचा अवलंब केला जातो हे आगामी काळात स्पष्ट होणार असल्याचे समजते.

 

कोणती कलम लावण्यात आली –
राज ठाकरे यांच्यावर कलम 116, 117, 153 आयपीसी (IPC) 1973 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act) 1951 सुधारीत 31 जुलै 2017 या कलमांतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | FIR filed by aurangabad police now what exactly is the option before mns chief raj thackeray lets see

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा