महाविकास आघाडीवरून ‘राज’गर्जना, उद्धव ठाकरेंचा ‘असा’ घेतला समाचार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील अनेक दिवसांपासून मनसे आपल्या पक्षाचा झेंडा बदलणार असल्याची चर्चा होती. अखेर आज महाअधिवेशनामध्ये मनसेने आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. मनसेचा नवा भगवा झेंडा समोर आल्यानंतर पक्ष हिंदूत्वाच्या दिशेने जाणार का अशी चर्चा सुरु झाली. यावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले की, भगवा हाच माझा डीएनए आहे. मी अनेकदा मराठीसाठी आणि हिंदुत्वासाठी भूमिका घेतलेली आहे. तुम्ही हिंदुत्वाकडे जात आहात का, असा प्रश्न विचारणारे तेव्हा कुठे होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

माझ्या मराठीला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन. कोणी माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न केल्यास मी हिंदू म्हणून मी त्याचा समाचार घेईल, अशा शब्दांत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नव्हतं. त्यावेळी पाकिस्तानच्या कलाकारांविरोधात मनसेनेच भूमिका घेतली होती. दहीहंडीच्या थरांवर निर्बंध आणल्यानंतर मीच आवाज उठवला होता, याची आठवण देखील राज ठाकरे यांनी यावेळी करून दिली.

पक्षाचा झेंडा का बदलला
पक्षाचा झेंडा का बदलला यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की 2006 साली जेव्हा मनसे स्थापन केली तेव्हा माझ्या मनातला जो झेंडा होता तो हा झेंडा आहे. शिवतीर्थावरच्या सोहळ्यात मी सांगितले होते की बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सुरु केली होती तेव्हा माझे आजोबा तिथे होते. शिवसेना जी वाढली ती बाळासाहेबांच्या कर्तुत्वाने वाढली. माझ्या मनात हा झेंडा पहिल्यापासून होता परंतु मला अनेक जण भेटायला यायला लागले, सांगायला लागले की आपल्या झेंड्यात हा रंग हवा तो रंग हवा. परंतु तेव्हा मला सांगायला कोणी नव्हतं, मागे कोणी नव्हतं. परंतु माझ्या डोक्यातून हा झेंडा गेला नव्हता.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like