MNS Chief Raj Thackeray | सिंधुदुर्गमध्ये एन्ट्री करताच राज ठाकरेंचा विरोधकांना सूचक इशारा, म्हणाले…

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) सिंधुदुर्गमध्ये आले आहेत. शहरात एन्ट्री करताच राज ठाकरे यांनी मला बोलता येतं पण मी उद्या बोलेने असे म्हणत विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. कोल्हापूरचा दौरा आटपून सायंकाळी सावंतवाडीत दाखल झालेल्या राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचे मनसे कर्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवाजी चौकात स्वागत केले.

 

यावेळी राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यासोबत मनसे विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे नेत्या अनिता माजगावकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, शहर प्रमुख आशिष सुभेदार, अनिल केसरकर, दया मस्त्री यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

स्वागत समारंभानंतर राज ठाकरे थेट मनसे कार्यालयात गेले.
कार्यालयात प्रवेश करताच त्यांनी रामेश्वर प्लाझा या मुख्य बाजारपेठेतील इमारतीमध्ये जागेचे दर विचारले. आपल्याला तिथे कार्यालय करायचे आहे,
असे सांगत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सुखद धक्का दिला. त्यानंतर त्यांनी उपस्थित असलेल्या सर्वांशी संवाद साधला.
उपस्थित पत्रकारांशी बोलणार का? असे विचारताच मला बोलता येते, पण आज नाही उद्या सविस्तर बोलेन, असे म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला.

 

सध्या राज ठाकरे यांच्या निशाण्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्रिमंडळातील काही नेते आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आहेत.
त्यामुळे उद्या राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | i can speak but i will speak tomorrow raj thackerays warning to the opposition

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kriti Sanon | प्रभासबरोबर अफेअरच्या चर्चांवर क्रिती सेनॉनचा मोठा खुलासा; इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत सोडले मौन

Shreyas Talpade | अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेनं मुलाखतीदरम्यान ‘या’ गोष्टीचा केला खुलासा

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर