MNS Chief Raj Thackeray | ‘राज ठाकरेंनी वाचन वाढवावं’ म्हणाऱ्यांना राज ठाकरेंचा टोला, म्हणाले – ‘मी जेव्हा चार दुऱ्या टाकतो, तेव्हे ते…’

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे परखड भूमिका मांडत असल्याने ते राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) नेहमीच चर्चेत असतात. राज ठाकरे यांच्या भाषणाला प्रचंड गर्दी होत असते. भाषणात मुद्दे मांडत असताना राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) विरोधकांना शाब्दिक चिमटेही काढत असतात. मध्यंतरी राज ठाकरे यांना वाचन वाढवण्याची गरज असल्याची टीका करण्यात आली होती. या टीकेला पनवेल मधील वसुदेव बळवंत फडके नाट्यगृहात (Vasudev Balwant Phadke Auditorium in Panvel) मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Bhasha Din) घेण्यात आलेल्या मुलाखतीत ठाकरी शैलीत उत्तर दिले.

मी जेव्हा चार दुऱ्या टाकतो…

राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) थोडं वाचन वाढवावं अशी टीका करणाऱ्यांविषयी काय वाटतं असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, हा त्यांच्या अज्ञानाचा भाग असतो. मला काही फरक पडत नाही या गोष्टींचा. पण मी जेव्हा त्यानंतर चार दुऱ्या टाकतो, तेव्हा ते पॅक होतात. त्यापुढे त्यांना बोलता येत नाही, असा मिश्किल टोला त्यांनी टीकाकारांना लगावला.

मी चेहरे वाचतो…

मुलाखतीमध्ये ठाकरे नेमकं काय वाचतात? असं विचारलं असता राज ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न करता ‘चेहरे’ असे उत्तर दिले. त्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. दररोज माणसंच इतकी भेटायला येतात की चेहरे पटकन वाचता येतात. मी माणसं वाचतो. कोण बरोबर राहणार आहे आणि कोण जाणार आहे हे बरोबर कळतं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

मतदारांना काही किंमत नाही

मुलाखती दरम्यान राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात सध्या चालू असलेल्या राजकारणावर भाष्य केलं. सध्याची राज्यातील राजकीय स्थिती पाहता मतदारांना काही किंमत आहे असं मला वाटत नाही. तुम्ही फक्त यांचे नोकर आहात. मतदान करा आणि मोकळे व्हा. बाकी आम्ही आमचं काय नाचायचं ते नाचू. आज याच्याबरोबर फुगडी तर त्याच्याबरोबर झिम्मा असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी राजकीय मुद्यांवर सविस्तर बोलणं टाळलं.

मी सामना वाचत नाही

वृत्तपत्रांच्या मुद्यावर बोलताना आपण मार्मिक आणि सामना वाचत नसल्याचे सांगितले.
मी सामना-मार्मिक वाचत नाही. माझ्याकडे हे दोन्ही येतात, पण मी वाचत नाही.
हल्ली वर्तमानपत्रांमध्ये तशा बातम्या नसतात. चॅनल्स तर बघवतच नाहीत, असेही ठाकरे म्हणाले.

दादा कोंडकेंचं पुस्तक आवडतं

तुम्हाला कोणतं पुस्तक आवडतं असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले,
खरंतर बरीच पुस्तक खूप जवळची आहेत. मात्र दादा कोंडके (Dada Kondke) यांच्यावरचं ‘एकटा जीव’ हे
पुस्तक खूप छान आहे. ते कुठूनही वाचता येते. कुठूनही तुम्ही ते वाचायला सुरुवात केली की त्यात रमून जाता,
असं राज ठाकरे म्हणाले.

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | i read people know who is going and to stay with me says mns chief raj thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raigad Crime News | पोलादपूरमध्ये 55 वर्षीय व्यक्तीची नैराश्याच्या भरात आत्महत्या

Pune Crime News | एक्स्ट्रा चार्जेस कमी करुन घेणे पडले महागात; टीम व्हिव्हर अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून केली फसवणूक

Maharashtra Budget Session 2023 | शिवसेनेनं बजावला 55 आमदारांना व्हीप, भास्कर जाधवांचे टीकास्त्र म्हणाले- ‘अशा व्हीपला आम्ही भीक घालत नाही’