MNS Chief Raj Thackeray | ‘हा दागिना फक्त सराफाच्या घरीच मिळू शकतो’, राज ठाकरेंचे अशोक सराफ यांच्याबद्दल गौरवोद्गार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या सारखे लोक आपल्या आयुष्यात नसते तर आपलं काय झालं असतं. हा दागिना फक्त सराफाच्या घरीच मिळू शकतो, असे गौरवोद्गार मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी काढले आहेत. पुण्यात ‘अशोक पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यात राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

 

दक्षिणेमध्ये असते तर ते आज मुख्यमंत्री असते
राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) पुढे म्हणाले, ज्या व्यक्तीला आपण लहान पणापासून बघत आलोय त्याच व्यक्तीला आपण आवडत असू तर हे आनंद देणारे आहे. समोर कोणीही असो अशोक सराफांना फरक पडला नाही. आजही अशोक सराफ यांचे नाव असेल तर सभागृह हाऊस फुल होते. अशोक सराफ जर दक्षिणेत असते तर आज मुख्यमंत्री (CM) राहिले असते. त्यांच्या 40-40 फूट कटावेजवर दुग्धाभिषेक झाला असता. आपल्याकडे प्रतिमा जेवढ्या जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नसल्याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

तुम्हीच सीमा प्रश्न सोडवला
मला आज समजल तुमचं मूळ घारणं बेळगावचं. त्यामुळे तुम्हीच सीमाप्रश्न सोडवला असं वाटतं, असे राज ठाकरे म्हणाले.
मोठ्या माणसांचे सत्कार करण्यासाठी मोठी माणसे राहिली नाहीत.
त्यामुळे आमच्यासारख्यावर आटोपयला लागत.
हा कार्यक्रम जर युरोपात असता तर त्या देशाचे पंतप्रधान (PM) आले असते.
हे लोक आपल्या आयुष्यात नसते तर आपलं काय झालं असतं.
हा दागिना फक्त सराफाच्या घरीच मिळू शकतो, असे राज ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | if ashok saraf would have been in the south he would have been the chief minister today said raj thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon ACB Trap | 20 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ajit Pawar | अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना फटकारलं, म्हणाले – ‘लोकप्रतिनिधी झाला म्हणजे शिंगे फुटली का?’

Lady Police Constable Suicide | धक्कादायक! नाईट ड्युटीवरुन येताच महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या