राज ठाकरे लवकरच घेणार अमित शहांची भेट; ‘हे’ आहे भेटीमागचे कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी राज्यासह देशाच्या काही भागांमध्ये देशविरोधी कट शिजत आहेत. याची माहिती देण्यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. पाकिस्तान, बांग्लादेशमधून आलेल्या घुसखोरांना हाकलून द्या. त्यासाठी माझ्या मोदी सरकारला माझा पूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात त्यांनी मराठी भाषा, हिदुत्व, सीएए, एनआरसीसारख्या विविध मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसी या देशातील महत्वाच्या प्रश्नावर भाष्य केले. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर मुस्लिमांना देशातून बाहेर हकलून देण्याची गरज आहे. ही भूमिका मी आधीही मांडली आहे आणि त्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. घुसखोरांना देशाबाहेर हकलून देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

बाहेरच्या देशातून मौलवी देशविघातक कारवाया करत आहेत. याची माहिती आपल्याकडे आहे. यासाठी मी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेऊन त्यांनी याबाबतची माहिती देणार आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान घुसखोरांना देशातून हाकलून दिले पाहिजे. त्यासाठी येत्या 9 फेब्रुवारी रोजी मनसे मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. सीएए आमि एनआरसीच्या विरोधात मनसे मोर्चाने उत्तर देणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like