EVM विरुद्धच्या मोर्चासाठी राज ठाकरेंचे ममता ‘दीदीं’ना मुंबई येण्याचे ‘आवतन’

कोलकता : वृत्तसंस्था – ईव्हीएम विरोधी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देशातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी-गाठी घेत आहेत. त्या पार्श्चभूमीवर राज ठाकरे यांनी आज (बुधवार) कोलकात्यात जाऊन मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. कोलकाता राज्याच्या सचिवालयात त्यांची भेट घेतली.यावेळी ९ ऑगस्ट रोजी EVM विरुद्ध सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राज ठाकरे यांनी निमंत्रण दिले आहे.

राज ठाकरे यांना महाराष्ट्रातच काम करताना पाहिले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर आपला मोर्चा वळवला आहे. आगामी विधानसभा निवडणुका EVM वर न घेता त्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज ठाकरे नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधकांची भेट घेत आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. आयुक्तांकडे त्यांनी EVM विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. आज त्यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन त्यांना मोर्चामध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.

राज ठाकरे तीन दिवसांच्या कोलकता दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या सोबत अमित ठाकरे हे देखील आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे म्हणले की, ममता बॅनर्जी यांच्या आमंत्रणावरून आपण कोलकत्यामध्ये आलो आहोत. EVM आणि इतर राजकीय मुद्यांवर चर्चा झाल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्यावर विश्वास नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काही दिवसात जाहीर होईल. ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात येणार नसेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू अशी मनसेची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र पुण्यात रविवारी (दि. २८) शरद पवार यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत बॅलेट पेपरवर निवडणूक नसेल तर बहिष्कार ही राज ठाकरेंची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचं सांगितलं.

आरोग्यविषयक वृत्त