MNS Chief Raj Thackeray | ‘… हे पंतप्रधानांना शोभत नाही’, राज ठाकरेंचे परखड मत

Advt.

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. एखादा दुसरा उद्योग बाहेर गेल्यानं राज्याचे फार नुकसान होणार नाही, असे मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी म्हटले. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील प्रत्येक राज्याकडे समान बघितले पाहिजे. आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं पंतप्रधानांना शोभत नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. एखाद्या भूमिकेला राजकारणात विरोध करणे चुकीचे नाही. चांगले काम केले तर त्यांचे कौतुक केले पाहिजे असेही राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) म्हणाले. ते पिंपरी चिंचवडमध्ये भरवण्यात आलेल्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात बोलत होते.

 

‘व्यंग ,वास्तव आणि राजकारण’ या विषयावर 18 वे जागतिक मराठी साहित्य संमेलनात (Jagtik Marathi Sammelan) ‘शोध मराठी मनाचा’ या परिसंवादात राज ठाकरे यांची प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर यांनी मुलाखत (Interview) घेतली. यावेळी राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) विविध मुद्यांवर भाष्य केलं.

 

जे आहे ते जरी टिकवलं तरी…
जे चांगलं आहे त्याला चांगलच म्हणणार. जे वाईट आहे त्याला वाईटच म्हणणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, सर्वार्थाने अग्रसर आहे. जे आहे ते जरी टिकवलं तरी महाराष्ट्र पुढे आहे. एखादा उद्योग बाहेर गेला तरी फरक पडत नाही. आपण गुजरातचे आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधानांना शोभत नाही. आधीचे पंतप्रधान मनमोहन सिंह (Former PM Manmohan Singh) हे पंजाबी होते मग त्यांनी काय फक्त पंजाबचे पाहावं का? उद्या आसामचा कोणीतरी होईल त्यांनी तसंच करायचं का? नुसतं एकसंघ म्हणायचं, असं असतं का एक संघ असा सवाल राज ठाकरेंनी विचारला

अजित पवारांना टोला
महाराष्ट्रात सध्या महापुरुषांबाबतच्या व्यक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले,
जातींमध्ये तेढ निर्माण करुन त्यामध्ये महापुरुषांना खेचणे, हे राजकारण नाही.
सध्याच्या काळात कोणालाही वाटायला लागलंय की, मी इतिहासतज्ज्ञ आहे.
कुणी काही ही संदर्भ द्यायला लागले. मागचा पुढचा विचार करायचा नाही.
काहीही बोलायचे, असे म्हणत राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray comment on pm narendra modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक