MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, पत्रात ‘या’ भाषेतील शब्दांचा वापर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) मिळाली आहे. बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा त्यांनी दिला आहे. धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा (Urdu Words) वापर करण्यात आला असल्याची माहिती नांदगावकर यांनी दिली. राज्य (State Government) आणि केंद्र सरकारने (Central Government) याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

 

या प्रकरणात नांदगावकर यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Home Minister Dilip Walse – Patil) यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नांदगावकर यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांची भेट घेतली. तसेच त्यांना या पत्राची प्रतही दिली.

 

नांदगावकर म्हणाले, मला आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आली आहे.
या पत्राची प्रत मी काल पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिली आहे. गृहमंत्र्यांशी देखील बोलणं झालं आहे.
हे पत्र कोणाकडून आलंय याबद्दल माहिती नाही. नांदगावकरला धमकी दिली तर ठीक आहे पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या केसाला धक्का लागला तर राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी, असेही ते म्हणाले.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray death threat from letter leader Bala Nandgaonkar said

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा