पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी हिंदुत्त्वाची भूमिका घेतल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत. मशिदींवरील भोंग्याच्या (Mosque Loudspeakers) मुद्द्यावर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. ते अयोध्या (Ayodhya) दौरा करणार असून सध्या ते माध्यमांचे आकर्षण आहे. स्पष्टपणे आणि परखडपणे बोलणारी व्यक्ती म्हणून राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) सर्वत्र ओळख आहे. काही वेळा ते माध्यमांच्या प्रतिनिधींनाही खडे बोल सुनावतात. त्याचीच झलक मंगळवारी रात्री पुण्यात (Pune News) पाहायला मिळाली. जिथे जाईल तिथे माध्यमांचे प्रतिनिधी असल्याचे लक्षात येताच त्यांनी वैतागून जगू द्याल की नाही असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींना केला. त्यानंतर माध्यम प्रतिनीधींनी आपले कॅमेरे खाली केले.
…अन् जगू द्याल की नाही असे म्हणत राज ठाकरे पत्रकरांवर चिडले pic.twitter.com/jYnqrlN8nK
— Policenama (@Policenama1) May 18, 2022
राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते दोन दिवस पुणे दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी पुण्यात दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर सायंकाळी ते अक्षरधारा या पुस्तकाच्या दुकानाला भेट देण्यासाठी गेले होते. ते सतत नवनवीन पुस्तक घेत असतात. अक्षरधारा या दुकानाला ते नेहमीच भेट देतात. कालही त्यांनी भेट दिली. राज ठाकरेंचा दौरा म्हणजे माध्यमांचे प्रतिनिधी वाट पाहणार हे नक्कीच. गाडीतून खाली उतरताच माध्यमांचे प्रतिनिधी पाहून राज ठाकरे चांगलेच भडकले. त्यांनी थेट माध्यमांच्या प्रतिनिधींकडे जाऊन जगू द्याल की नाही? असा प्रश्न केला.
त्यानंतर ते रागातच तेथून निघून गेले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. त्याची तयारी सुरू झाली असून तत्पूर्वी त्यांची पुण्यात सभा होणार आहे.
त्याचीही तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या राज ठाकरे हे माध्यमांसाठी चर्चेचा विषय आहे.
Web Title :- MNS Chief Raj Thackeray | MNS Chief raj thackeray gets angry with journalists while going to shop only one question asked in pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Petrol Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
- Benefits Of Eating Coconut And Coconut Water | नारळाच्या पाण्याबद्दल बरेच ऐकले असेल, परंतु कधी नारळ चहा प्याला का?
- Benefits Of Buttermilk In Summer | उन्हाळ्यात दररोज ताक प्यायल्यास आरोग्यासाठी होतील ‘हे’ 4 फायदे