MNS Chief Raj Thackeray | कुस्तीपटूंची फरफट थांबवा, महिला कुस्तीपटूंच्या न्याय्य मागण्याकडे लक्ष द्या: मनसे प्रमुख राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India (WFI) अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (BJP MP Brijbhushan Sharan Singh) यांच्या विरोधात ऑलिम्पिक (Olympics) पदक विजेत्या कुस्तीपटूंनी आंदोलन केले. राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला वेगळं वळण लागले. काल आंदोलकांनी हरिद्वार येथील गंगेत पदकं विसर्जित करण्याचा निर्णय घतेला. मात्र, शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पैलवानांच्या समर्थनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहिलं आहे. आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, अशी मागणी राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) केली आहे.

सन्मा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना 28 मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावे, ही नम्र विनंती, असं राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी काय लिहिलं पत्रात?

सस्नेह जय महाराष्ट्र,

 

 

आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेंव्हा म्हणता येईल जेंव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता ‘प्रधानसेवक’ ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती.

https://twitter.com/RajThackeray/status/1663886839906983937?s=20

ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही ‘बाहुबला’चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे

 

ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेंव्हा असो की मुंबईतील 26/11 च्या घटनेच्या (26/11 incident in Mumbai) वेळेस धाव घेतली होतीतही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा/ विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे.

 

म्हणूनच जर त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या
रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल?
आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुःखाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर ‘खेलो इंडिया’
हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची 28 मे ला
ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल
इतकं तर आपण नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे.
आपण ह्या विषयांत लक्ष घालावं आणि ह्या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती,
असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

 

Web Title :  MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray has written a letter
demanding that prime minister narendra modi should pay attention to the agitation
against former president of wrestling federation of india and bjp mp brijbhushan sharan singh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा