MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल होणार; रविवारी शस्त्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | गेल्या काही दिवसापुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची (Corona) लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या पायावरील शस्त्रक्रिया (Surgery) पुढे ढकलण्यात आली. यानंतर राज ठाकरे यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे. पायाचं दुखणं वाढल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना आज दुपारी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital, Mumbai) दाखल करण्यात येणार आहे.

 

राज ठाकरेंवर उद्या हिप बोनची (Hip bone) शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी ते आजच दुपारी काही चाचण्यांसाठी लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज या चाचण्या होतील आणि उद्या (रविवारी) शस्त्रक्रिया पार पडेल. दरम्यान, या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांना 2 महिन्यांसाठी घरी आराम करावा लागणार आहे.

 

दरम्यान, जूनच्या सुरुवातीला शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र त्यांच्या शरीरात कोरोनाचा अंश आढळून आला. त्यामुळे त्यांना भुलीचे इंजेक्शन देणं शक्य नव्हतं. म्हणून ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. हे दुखणं वाढल्यामुळे मे महिन्यातला आपला पुणे दौरा (Pune Tour) अर्धवट सोडून राज ठाकरे मुंबईला रवाना झाले होते. त्याचबरोबर 5 जून रोजी होणारा अयोध्या (Ayodhya) दौरा देखील त्यांनी स्थगित केला होता.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | MNS chief raj thackeray hip bone surgery on 19 june in lilavati hospital

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा