ताज्या बातम्यामुंबईराजकीय

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा; म्हणाले – “…त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | राज्याच्या राजकारणात महाभूकंप झाला आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिलेल्या राजीनाम्यानंतर ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसळलं आहे. यामुळे राज्यभर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीमुळे सरकारला धक्का बसला आहे. यानंतर भाजप (BJP) आणि शिंदे गटामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आता ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

 

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्याच्या सत्तानाट्यावर पहिलीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हास सुरू होतो,” असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरेंचा हा रोख उद्धव ठाकरेंवर असल्याची चर्चा आहे.

 

 

दरम्यान, राज्यातील सत्ता संघर्षाला नवं वळण लागलंय. काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
त्यामुळे राज्यात आता भाजपचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे.
शिंदे गटाने केलेल्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आणि अखेर ठाकरेंना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | MNS Chief Raj Thackeray On Shivsena Uddhav Thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ultimate Kho Kho-Punit Balan | उद्योगपती पुनीत बालन आणि रॅपर बादशाह यांनी अल्टीमेट खो-खोसाठी मुंबई संघाची केली खरेदी

 

Karnataka High Court चा मोठा आदेश, अटक केलेल्या आरोपीला सामान्यपणे हातकडी घालता येऊ शकत नाही

 

Pune Crime | ‘कुत्र्या तुझे उदे उदे करुन टाकतो’, व्याज दिले असतानाही रस्त्यावर आणण्याची धमकी देणार्‍या सावकारावर FIR

 

LIC Jeevan Umang Policy | ‘या’ स्कीममध्ये दररोज करा 45 रुपयांची गुंतवणूक, एकाच वेळी मिळतील 36 लाख

 

Ultimate Kho Kho-Punit Balan | उद्योगपती पुनीत बालन आणि रॅपर बादशाह यांनी अल्टीमेट खो-खोसाठी मुंबई संघाची केली खरेदी

Back to top button