MNS Chief Raj Thackeray | ‘औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश काढले नाहीत’ ! पण, राज ठाकरेंच्या सभेवर प्रश्नचिन्ह?

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची येत्या 1 मे रोजी औरंगाबाद (Aurangabad News) येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळ (Marathwada Sanskrutik Mandal Aurangabad) येथे होणार असल्याची चर्चा आहे. मात्र या सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये जमावबंदीचे (Curfew) आदेश लागू झाल्याचे वृत सर्वत्र पसरल्याने त्यावर मोठी चर्चा रंगली आहे. अखेर औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता (IPS Dr. Nikhil Gupta) यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.

माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता (Aurangabad Police Commissioner Dr. Nikhil Gupta) यांनी सांगितले की, औरंगाबाद शहरात जमावबंदीचे आदेश काढण्यात आलेली नसल्याची माहिती त्यांनी आज (मंगळवारी) दिली आहे. शहरांमध्ये जमावबंदीचा आदेश संदर्भात कोणत्याही प्रकारचे आदेश काढण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

औरंगाबाद शहरात 13 दिवस जमावबंदीचे आदेश काढल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. या आदेशामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र अखेर पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी याबाबत स्पष्टीकरण देत शहरांमध्ये जमावबंदीचा आदेश संदर्भात कोणत्याही प्रकारचे आदेश काढले नसल्याचे त्यांनी सांगितलं.

दरम्यान, सभेला परवानगी मिळाली नसली तरीही राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारीला लागा असे आदेश त्यांनी मनसेच्या नेत्यांना (MNS Leader) आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पक्ष सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Web Title : MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray rally in aurangabad on 1 may 2022 police
did not imposed section 144 in city urangabad Police Commissioner Dr. Nikhil Gupta

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ ! कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

Pune Crime | घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’, बलात्कार प्रकरणी FI