मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना कोरोनाची बाधा (Corona Positive) झाली असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना पायाच्या दुखन्याने त्रास होत आहे. त्यांच्या पायवर शस्त्रक्रिया (Surgery) होणार असल्याने ते काल (मंगळवारी) मुंबईतील लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital in Mumbai) दाखल झाले आहेत. तपासणी दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. (MNS Chief Raj Thackeray)
राज ठाकरे यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या आजारात आणखी एक भर पडली आहे. दरम्यान, कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आधी कोविड डेड सेलमुळे राज ठाकरेंना वैद्यकीय भूल (अॅनेस्थेशिया) देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी राज ठाकरेंची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितलं. परंतु, त्यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
राज ठाकरे यांना रूग्णालयात दाखल करताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णालयाच्या आवारात होते. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) आणि मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील रुग्णालयात दाखल झाले. याच चाचण्या दरम्यान कोव्हीड डेड सेल्स मुळे भूल देता येणे शक्य नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray surgery postponed due to covid
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- LPG Cylinder Price Today 1 June | व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त, घरगुती सिलेंडरच्या ग्राहकांना दिलासा नाहीच; जाणून घ्या दर
- Petrol-Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या
- Devendra Fadnavis | ‘बैल एकटा येत नाही, जोडीनं येतो अन् ते पण नांगरासकट’ – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
- Amruta Fadnavis | अमृता फडणवीस पहिल्यांदाच ‘त्या’संदर्भात बोलल्या; म्हणाल्या – ‘Twitter वरील प्रकारामुळे त्यांना माझी चिंता वाटते’