MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन वाढलं असेल” – राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचे व्याही प्राध्यापक संजय बोरुडे (Professor Sanjay Borude) यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी मुंबईत पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली आहे. ‘मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन वाढलं असेल. पण आता मला शारीरिक वजन कमी करुन राजकीय वजन वाढवावे लागेल,’ असं विधान राज ठाकरे यांनी यावेळी केलं आहे.

 

त्यावेळी बोलताना राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) म्हणाले की, ”जवळपास 35 वर्षे माझं वजन 63 किलो इतकेच होते. पण त्यानंतर वजन आणि इतर गोष्टी वाढायला लागल्या. आपण आरोग्या संदर्भातील पथ्यपाणी खूप गांभीर्याने घेतले पाहिजेत. मात्र, आपण आज करु, उद्या करू, या नादात कायम टाळाटाळ करत राहतो. मला सध्या त्रास होत असल्यामुळे मला या सगळ्याची जाणीव होत आहे.”

 

पुढे राज ठाकरे म्हणाले, ”मी खरंतर बॅडमिंटन खेळणार, क्रिकेट खेळणारा, टेनिस खेळणारा आहे. पण सध्या मला कोणताही व्यायाम करता येत नाहीये. मला कुठलाही खेळ खेळता येत नाही. त्यामुळे मी त्या गोष्टीला विटलो आणि म्हणालो एकदाचं ऑपरेशन करून टाकू. अर्थात त्यानंतर मला फार धावता येईल, असंही नाहीये. पण त्यानंतर सगळं सुरळीत होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण सगळ्यांनी या गोष्टींची खरंच काळजी घेणे गरजेचे आहे.”

”मुलांमुळे मला झोमॅटोसारख्या गोष्टी माहिती झाल्या. त्यावरून मी घरी अनेक पदार्थ मागवतो.
त्यांच्यासोबत मीही कधीकधी वाहत जातो, परंतु, नशीबाने माझ्या घरामध्येच डॉक्टर असल्यामुळे आता आम्ही बराच कंट्रोल ठेवत असतो.
कित्येकदा मी संध्याकाळी डॉक्टरांना (संजय बोरुडे) विचारतो, आज काय जेवणार? त्यावर ते, मी काही नाही, असे म्हणतात.
पण डायनिंग टेबल लागलं की ते येऊन जेवायला सुरुवात करतात. त्यामुळे संध्याकाळी मी एक वेगळा कंट्रोल घेतो.
पण डायनिंग टेबलवर बसल्यानंतर माझा कंट्रोल निघून जातो. डॉक्टर थोडचं खातात, पण मी जरा जास्त खातो.” असं राज ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray told about how his weight gain increases and leg surgery

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा