MNS Chief Raj Thackeray | पुण्यात ‘या’ दिवशी ‘राज’ गर्जना ! सभेची जागा ठरली, पोलिसांचीही परवानगी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील (Pune) सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज ठाकरे यांची पुण्यातही गर्जना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील राज ठाकरे यांच्या सभेची जागा ठरली असून डेक्कन नदी पात्रात ही सभा होणार आहे. आजपासून राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात पोहचण्याआधीच सभेची तारीख ठरली आहे.

 

पुण्यातील मनसे अंतर्गत वाद तसेच पुण्यात मनसेची सभा या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा (MNS Chief Raj Thackeray) महत्वाचा दौरा असणार आहे. राज ठाकरेंची सभा 21 मे रोजी डेक्कन नदीपात्रात होणार आहे. राज ठाकरे यांना पुण्यात सभेसाठी परवानगी मिळाली आहे. पुणे पोलिसांकडून (Pune Police) राज यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे.

 

दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेसाठी 3 जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. परंतु, जागेत बदल करण्यात आला.
मनसेने डेक्कन पोलिसांना पत्र दिले आहे. 15 मे रोजी राज यांच्या सभेबाबत हे पत्र दिले होते.
काल (सोमवारी) येथील जागेची पाहणी करण्यात आली आहे. आता परवानगी मिळाल्याने नदी पात्रात राज ठाकरे यांची सभेत तोफ धडाडणार आहे.

 

 

Web Title :- MNS chief raj thackeray will conduct political rally in pune on 21st may 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा