MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल होणार; ‘या’ दिवशी होणार शस्त्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मंगळवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital Mumbai) अ‍ॅडमिट (Admit) केले जाणार आहे. पायावर शस्त्रक्रिया (Surgery) केली जाणार असल्यानं त्यांना अ‍ॅडमिट केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 1 जून रोजी ही शस्त्रक्रिया पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या पायाच्या जुन्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया केली जाणार अशी चर्चा होत होती. त्याबाबत डाॅक्टरांनी सल्ला देखील दिला होता. त्यामुळे पायाच्या दुखण्याने राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा (Ayodhya Tour) रद्द केला असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान आता राज यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं फिक्स झालं आहे. त्यामुळे त्यांना मंगळवारी 31 मे रोजी लीलावती रुग्णालयात अ‍ॅडमिट केले जाणार आहे.

 

दरम्यान, ”आपण आरोग्यासंदर्भातील पथ्यपाणी खूप गांभीर्याने घेतल्या पाहिजेत.
मात्र, आपण आज करु, उद्या करू, या नादात कायम टाळाटाळ करत राहतो.
मला सध्या त्रास होत असल्यामुळे मला या सगळ्याची जाणीव होत आहे,” असं राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण 2 महिन्यांपर्यंत आराम करावा लागणार आहे.
त्यामुळे मनसेचा अयोध्या दौरा आणि मशिदींवरील भोग्यांबाबतचे आंदोलन थंडावण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray will undergo leg surgery in lilavati hospital mumbai on 1st june

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा