MNS Chief Raj Thackeray | पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड…; पुण्यातील सभेपूर्वी मनसेकडून टिझर प्रसिद्ध, उद्या ‘राज’ गर्जना !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा 5 जून चा नियोजित अयोध्या दौरा (Ayodhya Tour) स्थगित करण्यात आला. याबाबत खुद्द राज ठाकरेंनी माहिती दिली आहे. प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तसेच पुण्यात (Pune) सभेमध्ये याबाबत सविस्तर बोलणार असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेपूर्वी मनसेकडून (MNS) टिझर (Teaser) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

राज ठाकरेंच्या (MNS Chief Raj Thackeray) सभेपूर्वी मनसेकडून टिझर प्रसिद्ध केला आहे.
टिझरमध्ये गुढीपाडवा सभा, शिवतीर्थ या सभेत माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाहीये, मात्र तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका, असं राज ठाकरेंचं भाष्य दिसत आहे. त्याचबरोबर ठाण्यातील सभेत नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जेव्हा पंतप्रधान होतील, ते झाल्यावर त्यांनी उत्तर प्रदेश , बिहार आणि झारखंड या राज्याचा विकास करावा, असं राज ठाकरे बोलताना दिसत आहे. तसेच, पुण्यातील हनुमान चालीसा पठणाचंही टीझरमध्ये दाखवलं आहे. त्यानंतर औरंगाबादमधील सभेतील, रस्त्यावर नमाज पठण करण्याचे अधिकार कुणी दिले, असा सवाल राज ठाकरे करताना दिसत आहे. असं एक सध्या मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राज ठाकरेंची उद्या पुण्यात सभा –
राज ठाकरेंची पुण्यात उद्या जाहीर सभा होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
पहिल्यांदा 21 मे रोजी राज ठाकरे यांच्या सभेचं नदीपात्रात आयोजन करण्यात आलं.
मात्र, पावसाची शक्यता लक्षात घेता सभेचं नियोजन बदलून आता ती सभा रविवारी 22 मे रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच (Ganesh Kala Krida Rangmanch) इथे सकाळी 10 वाजता होणार असल्याचं म्हटलं आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns has released a teaser ahead of mns chief raj thackerays meeting in pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा